Katrina Kaifs Silence On CJP Protest: कतरिना कैफला लहानपणापासून फॉलो करायचा, पण लाडक्या अभिनेत्रीचं विद्यार्थी आंदोलनावरचं मौन पटलं नाही, थेटच उचललं टोकाचं पाऊल


Katrina Kaifs Silence On CJP Protest: सध्या दिल्लीतील (Delhi News) जंतर-मंतरवर (Jantar Mantar) कॉकरोच जनता पार्टीचं (CJP) नीट पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आंदोलन सुरू आहे. राजकीय व्यक्तींपासून ते सेलिब्रिटींपर्यंत अनेक व्यक्तींनी या आंदोलनाला पाठींबा दिला आहे. ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी (Shabana Azmi), अभिनेते प्रकाश राज (Prakash Raj), अमोल पराशर  विद्यार्थ्यांच्या खांद्याला खांदा लावून आंदोलनात सहभागी झालेले. तर, अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन विद्यार्थ्यांना पाठींबा जाहीर केलाय. पण, अजूनही काही सेलिब्रिटी असे आहेत, ज्यांनी मौन धारण केलंय. नीट पेपरफुटी (NEET Paper Leak Case), विद्यार्थ्यांचं आंदोलन यावर या सेलिब्रिटींनी चकार शब्दही काढलेला नाही. त्यामुळे त्यांचे चाहते भलतेच नाराज झाले आहेत. मौन बाळगणाऱ्या सेलिब्रिटींच्या यादीत बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफचाही समावेश आहे. त्यामुळे नाराज झालेल्या कतरिनाच्या एका चाहत्यानं मोठा निर्णय घेतला असून तो सविस्तर पोस्ट करत जाहीर करून टाकला आहे. 

कतरिना कैफच्या चाहत्याचा मोठा निर्णय (Katrina Kaif Silence On Student Protest)

सीजेपी आंदोलनावर कतरिना कैफनं मौन बाळगल्यानं तिचा एक चाहता भलताच नाराज झाला आहे. बरं हा चाहता कतरविनाचं फॅन पेज चालवायचा. कतरिनानं विद्यार्थी आंदोलनावर बोलणं टाळल्यामुळे त्यानं आता ते फॅन पेज बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, त्याच्या या फॅन पेजला 70 हजार फॉलोअर्स होते. फॅन पेजकडून लिहिण्यात आलंय की, “तुमच्यावर मनापासून प्रेम करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही काहीही बोलत नाहीत. मी लहानपणापासून तुम्हाला फॉलो करतेय…”, असं लिहून चाहत्यानं थेट कतरिनाचं फॅन पेज बंद करण्याचा निर्णय घेतला.

Katrina Kaifs Silence On CJP Protest: कतरिना कैफला लहानपणापासून फॉलो करायचा, पण लाडक्या अभिनेत्रीचं विद्यार्थी आंदोलनावरचं मौन पटलं नाही, थेटच उचललं टोकाचं पाऊल

चाहत्यानं पुढे थेट कतरिनाला उद्देशून म्हटलंय की, “तुमच्या पाठीला कणाच नाही, तुम्ही आमचा विश्वासघात केलाय… मी तुम्हाला अनफॉलो करतोय…” आपल्या लाडक्या अभिनेत्रीनं विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर मौन बाळगल्यानं नाराज झालेल्या चाहत्यानं थेट 70 हजार फॉलोअर्स असलेलं पेज बंद करुन टाकलंय. या चाहत्यापाठोपाठ कतरिनाला फॉलो करणाऱ्या अनेक चाहत्यांनी तिला अनफॉलो करायला सुरुवात केली आहे. तर, अनेकांनी कतरिनाचं समर्थनही केलंय. 

दरम्यान, ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या आंदोलनाच्या समर्थनात अनेक सेलिब्रिटी समोर आले आहेत. शबाना आझमी आणि प्रकाश राज यांसारख्या कलाकारांनी या आंदोलनात सहभाग घेतलाय. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईतही मोर्चे काढले जात आहेत. अभिनेता गुरफतेह सिंह पीरझादा,  आणि अभिनेत्री प्रतिभा रांटा यांनी मुंबईतील आंदोलनात सहभाग घेतला आणि त्यावेळचे फोटोही शेअर केलेत. तर, रितेश देशमुख, प्रीती झिंटा, अरमान मलिक, सोनू सूद, स्वरा भास्कर, सोनाक्षी सिन्हा यांनी सोशल मीडियावरुन व्यक्त होत, विद्यार्थी आंदोलनाला पाठींबा दर्शवला आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Aamir Khan Nephew Imran Khan Joins Student Protest: आमीर खानचा पत्ता नाही, पण भाचा मात्र विद्यार्थ्यांसाठी मैदानात, मुंबईत शिवाजी पार्कच्या रॅलीमधला VIDEO समोर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *