J.P. Nadda : नीट पेपरफुटी प्रकणावरुन दिल्लीच्या जंतर मंतरवर विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरु आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे. या आंदोलनाला अनेक राजकीय पक्षांनी विविध संघटनांनी पाठिंबा दिली आहे. महाराष्ट्रात देखील ठिकठिकाणी आंदोलने सुरु आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा ही मागणी जोर धरत असल्याचं पाहायला मिळत आहे. आज काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी देखील पत्रकार परिषद घेत सरकारवर जोरदार टीका केली. दरम्यान, यानंतर केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांनी देखील पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. राहुल गांधी पेपरफुटीवरुन राजकारण करत असल्याचा आरोप नड्डा यांनी केलाय. नीट पेपरफुटी प्रकरणी सरकार चर्चेसाठी तयार असल्याचेही नड्डा म्हणाले.
काँग्रेसच्या राज्यामधील पेपरफुटीवर राहुल गांधी का बोलत नाहीत?
काँग्रेसच्या राज्यामधील पेपरफुटीवर राहुल गांधी का बोलत नाहीत? असा सवाल देखील नड्डा यांनी यावेळी केला. काँग्रेसच्या सरकारमध्येही पेपरफुटी झाली असल्याचे नड्डा म्हणाले. विद्यार्थ्यांचं हित हा राहुल गांधी यांचा उद्देश नसल्याची टीका देखील नड्डा यांनी केली. नीट पेपरफुटी प्रकरणी सरकार चर्चेसाठी तयार असल्याचेही नड्डा म्हणाले. आंदोलनात राजकारण करु नये असेही नड्डा यावेळी म्हणाले. राजकारण सोडून समाजकारणावर चर्चा करा असेही ते म्हणाले. सभागृहात आम्ही या सगळ्या चर्चा करण्यासाठी तयार असल्याचे नड्डा म्हणाले.
विरोधी पक्षांनी आपली जबाबदारी पार पाडावी
विरोधी पक्षांनी आपली जबाबदारी पार पाडावी असेही नड्डा यावेळी म्हणाले. आम्ही चर्चेसाठी तयार आहोत. संसदेत नीट पेपरफुटी प्रकरणावर चर्चा होईल असे नड्डा म्हणाले. विरोधकांनी त्यांचे मुद्दे संसदेत उपस्थित करावेत, सरकार त्याची उत्तरे द्यायला तयार असल्याचे नड्डा म्हणाले. आम्ही नेहमीच चर्चेसाठी तयार होतो असेही देखील नड्डा म्हणाले. नड्डा यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी ते बोलत होते.
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी काँक्रोच जनता पार्टीचं दिल्लीतल्या जंतरमंतरवर आंदोलन सुरुच आहे. राजकीय नेत्यांनी आंदोलनस्थळी धाव घेतल्याने आंदोलक अधिकच आक्रमक झाले. आंदोलकांनी केंद्र सरकारला प्रचंड धारेवर धरलं. गुंडागर्दी नही चलेगी, तानाशाही नही चलेगीच्या घोषणा देऊन संपूर्ण परिसर दणाणून सोडला. दरम्यान आजही आंदोलक आंदोलनावर ठाम आहेत. त्यामुळे आजही आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार अभिजीत दिपकेंनी केला. तर दुसरीकडे सोनम वांगचुक यांच्यावर सफदरजंग रूग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांनी तिथेच उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार केला आहे.
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर