Weekly Horoscope 27 July To 2 August 2026: जुलै महिना संपायला अवघे काही दिवस शिल्लक आहेत, ज्योतिषशास्त्रानुसार, जुलैचा शेवटचा आठवडा लवकरच सुरू होतोय. हा आठवडा 27 जुलै ते 2 ऑगस्ट असा असेल. जो अत्यंत खास आहे, ज्योतिषींच्या मते, हा आठवडा अनेकांसाठी नशीब पालटणारा ठरणार आहे. या आठवड्यात गुरूपौर्णिमेचा सण येत आहे, सोबतच ग्रहांचे शुभ योग होत आहेत, त्यामुळे हा आठवडा अत्यंत खास आहे, सोबत ग्रहांच्या विविध राजयोगामुळे काही राशींना लाभदायक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.. तर काहींना संयम, नियोजन आणि खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक राहील. विशेषतः जुलै महिन्याचा नवा आठवडा (Weekly Horoscope) मेष ते मीन अशा सर्व 12 राशींसाठी नेमका कसा जाणार आहे? जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Weekly Horoscope)
ज्योतिषशास्त्रानुसार, मेष राशीसाठी 27 जुलै ते 2 ऑगस्ट 2026 या आठवड्यात कामाच्या ठिकाणी तुमच्या निर्णयक्षमतेची परीक्षा होईल. वरिष्ठांकडून नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबतीत अनावश्यक खर्च टाळा. प्रेमसंबंधांत संवाद वाढवा, गैरसमज दूर होतील. आरोग्याच्या दृष्टीने थकवा आणि डोकेदुखी जाणवू शकते.
वृषभ रास (Taurus Weekly Horoscope)
ज्योतिषशास्त्रानुसार, वृषभ राशीसाठी या आठवड्यात नोकरी आणि व्यवसायात प्रगतीची संधी मिळेल. रखडलेली कामे पूर्ण होतील. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील. गुंतवणुकीसाठी हा काळ अनुकूल असला तरी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल.
मिथुन रास (Gemini Weekly Horoscope)
ज्योतिषशास्त्रानुसार, मिथुन राशीच्या लोकांसाठी या आठवड्यात प्रवासाचे योग आहेत. नवीन ओळखी भविष्यात फायदेशीर ठरू शकतात. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल. आर्थिक स्थिती सुधारेल, मात्र उधार व्यवहार टाळा. आरोग्याची विशेष काळजी घ्या.
कर्क रास (Cancer Weekly Horoscope)
ज्योतिषशास्त्रानुसार, कर्क राशीसाठी या आठवड्यात भावनिक निर्णय घेणे टाळा. नोकरीत सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. व्यवसायात नवीन संधी मिळू शकतात. कुटुंबात एखाद्या शुभकार्याची चर्चा होईल. पचनाशी संबंधित त्रास होऊ शकतो.
सिंह रास (Leo Weekly Horoscope)
ज्योतिषशास्त्रानुसार, सिंह राशीसाठी या आठवड्यात आत्मविश्वास वाढेल आणि अनेक कामे वेळेत पूर्ण होतील. पदोन्नती किंवा पगारवाढीबाबत सकारात्मक घडामोडी होऊ शकतात. प्रेमसंबंध अधिक दृढ होतील. आर्थिक लाभाचे नवीन मार्ग खुलतील.
कन्या रास (Virgo Weekly Horoscope)
ज्योतिषशास्त्रानुसार, कन्या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा कामाचा ताण वाढू शकतो, त्यामुळे नियोजन महत्त्वाचे ठरेल. व्यवसायात नफा मिळण्याची शक्यता आहे. घरातील वडीलधाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घ्या. विद्यार्थ्यांसाठी आठवडा चांगला राहील.
तूळ रास (Libra Weekly Horoscope)
ज्योतिषशास्त्रानुसार, तूळ राशीच्या लोकांसाठी या आठवड्यात नशिबाची साथ मिळेल. रखडलेली आर्थिक कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबतचे मतभेद दूर होतील. नवीन प्रकल्प किंवा व्यवसाय सुरू करण्यासाठी वेळ अनुकूल आहे.
वृश्चिक रास (Scorpio Weekly Horoscope)
ज्योतिषशास्त्रानुसार, वृश्चिक राशीसाठी या आठवड्यात आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगा. कोणत्याही कागदपत्रावर स्वाक्षरी करण्यापूर्वी नीट वाचा. नोकरीत बदलाचा विचार करणाऱ्यांना चांगली संधी मिळू शकते. आरोग्याच्या बाबतीत नियमित व्यायाम करा.
धनु रास (Saggitarius Weekly Horoscope)
ज्योतिषशास्त्रानुसार, धनु राशीच्या लोकांसाठी हा आठवडा करिअरमध्ये अपेक्षित यश मिळेल. वरिष्ठांकडून कौतुक होईल. व्यवसायात नवीन ग्राहक मिळू शकतात. कुटुंबासोबत प्रवासाचे नियोजन होईल. प्रेमसंबंधात आनंदाचे क्षण अनुभवता येतील.
मकर रास (Capricorn Weekly Horoscope)
ज्योतिषशास्त्रानुसार, मकर राशीच्या लोकांसाठी या आठवड्यात संयम ठेवणे गरजेचे आहे. आर्थिक नियोजनावर भर द्या. कामाच्या ठिकाणी वाद टाळा. कुटुंबातील सदस्यांकडून सहकार्य मिळेल. आरोग्य सामान्य राहील.
कुंभ रास (Aquarius Weekly Horoscope)
ज्योतिषशास्त्रानुसार, कुंभ राशीच्या लोकांसाठी या आठवड्यात नवीन कल्पना आणि योजना यशस्वी ठरू शकतात. व्यवसायात अपेक्षित नफा मिळेल. विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षांमध्ये चांगले परिणाम मिळण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबतचे संबंध अधिक मजबूत होतील.
मीन रास (Pisces Weekly Horoscope)
ज्योतिषशास्त्रानुसार, मीन राशीच्या लोकांसाठी आठवड्याची सुरुवात उत्साहवर्धक राहील. करिअरमध्ये प्रगतीचे संकेत मिळतील. आर्थिक लाभामुळे आत्मविश्वास वाढेल. धार्मिक किंवा आध्यात्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. आरोग्य चांगले राहील.
हेही वाचा :
Ashadhi Ekadashi 2026: भगवान विठ्ठलाच्या कानातील माश्यांचं रहस्य काय? विठुरायाला हा दागिना इतका प्रिय का आहे? धार्मिक महत्त्व, पौराणिक कथा कमी लोकांना माहित…
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)