Mumbai rain News : मुंबईत आज सकाळपासून जोरदार पाऊस सुरु आहे. या जोरदार पावसामुळे पश्चिम द्रुतगती महामार्ग शेजारी अंधेरी येथील पंप हाउस जवळ डोंगराचा एक भाग खाली कोसळला आहे. डोंगराचा एक भाग घरावर कोसळत त्यानंतर रस्त्यावर खाली कोसळला आहे. सुदैवाने यामध्ये कोणत्याही जीवितहानी झाली नसल्याचा प्राथमिक माहिती मिळत आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक शिवसेना आमदार मुरजी पटेल यांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेऊन संबंधित पालिका आणि अग्निशमन दलाचे अधिकाऱ्यांना बोलवून डोंगराच्या रस्त्यावरील पडलेल्या ढिगाऱ्या बाजूला काढले.
नागरिकांमध्ये भीतीच्या वातावरण
यावेळी डोंगरावर असलेल्या धोकादायक घरांवर देखील पालिकेच्या माध्यमातून तोडक कारवाई करण्यात आली. त्यासोबत पुन्हा अशी घटना घडून काही मोठी दुर्घटना घडून यासाठी आमदार मुरजी पटेल कडून मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी डोंगराला सुरक्षा जाळी बसवण्याच्या आदेश दिले आहेत. अंधेरीत डोंगराचा भाग कोसळल्यामुळं परिसरात राहणारे नागरिकांमध्ये भीतीच्या वातावरण पसरले आहे.
मुंबई, पुणेसह राज्यातील बहुतांश सर्व जिल्ह्यांमध्ये पुढील 48 तास पावसाचा जोर राहणार
मुंबई, पुणेसह राज्यातील बहुतांश सर्व जिल्ह्यांमध्ये पुढील 48 तास पावसाचा (Maharashtra Rain Update) जोर कायम राहणार आहे. पालघर, रायगड, नाशिक घाटमाथा, पुणे घाटमाथा यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, कोल्हापुरला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पश्चिमेकडून वाहणारे वाऱ्यांचा जोर आणि तीव्रता अधिक झाल्यामुळे राज्यातील संपूर्ण भागांमध्ये सध्या पावसाची दमदार हजेरी पाहायला मिळते आहे. पूर्व विदर्भासह मराठवाड्यातील सगळ्या जिल्ह्यांमध्ये पाऊस चांगला झाल्यामुळे शेतकऱ्यांसाठी दिलासादायक वातावरण निर्माण झालं आहे. संपूर्ण मुंबईसह उपनगरात पावसाचा (Mumbai Rain News) चांगलाच जोर आहे. दक्षिण मुंबई, अंधेरी, बोरिवली, विरार, ठाणे, कल्याण डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, नवी मुंबई, पनवेल, भिवंडी, पालघर सगळीकडे रात्रभर पाऊस सुरू आहे. तर पुढील 48 तासानंतर राज्यात पावसाचा जोर कमी होईल, अशी माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे.
कोल्हापुरात पावसाचा जोर वाढला, पंचगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये झपाट्याने वाढ
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढल्याने पंचगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. यंदाच्या पावसाळ्यात पंचगंगा दुसऱ्यांदा पात्राबाहेर पडली आहे. गेल्या 24 तासात पंचगंगा नदीची पाणी पातळी आठ फुटाने वाढली आहे… सध्या पंचगंगा नदीची पाणी पातळी 31 फूट 4 इंच किती असून जिल्ह्यातील 23 बंधारे पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत.
Fadnavis Daughter X Post : सीजेपी आंदोलनावर मुख्यमंत्र्यांच्या कन्या दिविजा फडणवीसांची प्रतिक्रिया