Brain Ageing : व्यसनाधीनतेचे मेंदूवर होतात परिणाम, मेंदू होतोय वृद्ध, विचार करण्याच्या प्रक्रियेला येऊ शकते बाधा | लाइफस्टाईल बातम्या


Last Updated:

नैराश्य, चिंता यांसारख्या मानसिक समस्या वेगानं वाढत असतानाच, मद्यपानाच्या व्यसनाचं प्रमाण वाढतंय. याबद्दल एका अहवालात चिंता व्यक्त करण्यात आली आहे. जे लोक अतिमद्यपान करतात किंवा ज्यांना मानसिक आरोग्याच्या समस्या आहेत, त्यांच्या मेंदूचं वृद्धत्व वेगानं होऊ शकतं.

News18
News18

मुंबई : मद्यपानाच्या व्यसनाचं प्रमाण वाढत चालंलय. मद्यपानानं मेंदूवरही परिणाम होतोय.

नैराश्य, चिंता यांसारख्या मानसिक समस्या वेगानं वाढत असतानाच, मद्यपानाच्या व्यसनाचं प्रमाण वाढतंय. याबद्दल एका अहवालात चिंता व्यक्त करण्यात आली आहे. जे लोक अतिमद्यपान करतात किंवा ज्यांना मानसिक आरोग्याच्या समस्या आहेत, त्यांच्या मेंदूचं वृद्धत्व वेगानं होऊ शकतं.

मद्यपानाच्या व्यसनाचा थेट परिणाम कॉग्निटिव्ह फंक्शन म्हणजेच विचार करण्याची आणि माहितीवर प्रक्रिया करण्याची मेंदूची क्षमता यावर होतो.

मानसिक आजारामुळे मेंदूचे वृद्धत्व वेगानं होतं- संशोधनानुसार, स्मृतिभ्रंश, मद्यपानाचं व्यसन किंवा स्किझोफ्रेनिया यांसारख्या समस्यांनी ग्रस्त असलेल्या व्यक्तींमधे मेंदूच्या वृद्धत्वाची प्रक्रिया वेगानं घडू शकते.

प्रत्येक आजार मेंदूच्या विशिष्ट भागांवर एक वेगळी खूण उमटवतो. शरीराच्या वयाच्या तुलनेत मेंदूचं वय तपासण्यासाठी शास्त्रज्ञ  predicted age difference म्हणजेच प्रत्यक्ष वय आणि मेंदूच्या प्रतिमांवरून निश्चित केलेलं वय यांमधील तफावत याचा वापर करतात. याचा निकाल positive असेल, तर मेंदूवर परिणाम झाला आहे आणि वृद्धत्वाची प्रक्रिया वेगवान झाली आहे असा होतो.

चीनमधील नानजिंग युनिव्हर्सिटी ऑफ एरोनॉटिक्स अँड ॲस्ट्रोनॉटिक्सच्या संशोधकांनी सुमारे 45,900 निरोगी व्यक्तींचे एमआरआय रिपोर्ट्स गोळा केले. त्यानंतर, माहिती मिळवण्यासाठी शास्त्रज्ञांनी या माहितीची तुलना मेंदूशी संबंधित विविध विकारांनी ग्रस्त असलेल्या 2,698 रुग्णांच्या माहितीशी केली.

विश्लेषण केलेल्या परिस्थितींमधे ADHD म्हणजेच Attention-Deficit Hyperacticity Disorder, ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर – ASD, मद्य किंवा तंबाखूचं व्यसन, अल्झायमर, बौद्धिक अक्षमता, स्किझोफ्रेनिया, बायपोलर डिसऑर्डर आणि तीव्र नैराश्य विकार यांसारख्या मानसिक विकारांचा समावेश होता.

अल्झायमरसारखे मज्जासंस्थेचा ऱ्हास करणारे आजार म्हणजेच neurodegenerative diseases हे PAD म्हणजेच ‘प्रेडिक्टिव्ह एज डिफरन्स’ अधिक असण्याशी सर्वाधिक प्रबळपणे संबंधित असल्याचंही आढळून आलं. तसंच, व्यसन आणि मानसिक आजार यांचाही ‘प्रेडिक्टिव्ह एज डिफरन्स’ वाढण्याशी संबंध असल्याचंही दिसून आलं.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/

Brain Ageing : व्यसनाधीनतेचे मेंदूवर होतात परिणाम, मेंदू होतोय वृद्ध, विचार करण्याच्या प्रक्रियेला येऊ शकते बाधा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *