MLA Bapusaheb Pathare Book Theatre For Deool Band 2 Movie: तुम्ही नादच केलाय थेट! पुण्याच्या आमदाराकडून ‘देऊळ बंद 2’साठी अख्खं थिएटर बुक, मतदारसंघातल्या लोकांसोबत पाहिला अख्खा पिक्चर


MLA Bapusaheb Pathare Book Theatre For Deool Band 2 Movie: मराठी सिनेसृष्टीतला (Marathi Film Industry) बिनधास्त दिग्दर्शक म्हणून ओळखले जाणारे प्रवीण तरडे (Director Pravin Tarde) यांनी दिग्दर्शित केलेला  ‘देऊळ बंद’ (Deool Band) सिनेमा तुफान गाजला. त्यानंतर आता याच सिनेमाचा सीक्वेल ‘देऊळ बंद 2’सुद्धा (Deool Band 2) बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. या सिनेमानं मराठी रसिक-प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला आहे. सिनेमानं आपल्या धुवांधार कमाईनं चक्क रितेश देशमुखच्या गाजलेल्या ‘वेड’ सिनेमाला मागे टाकलं आहे. सिनेमा रिलीज होऊन आता जवळपास महिना होत आलाय, तरीसुद्धा या सिनेमाची क्रेझ कायम आहे. अजून सिनेमा बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करतोय. अशातच पुण्यातल्या एका आमदारानं हा सिनेमा आपल्या मतदारसंघातील लोकांना दाखवण्यासाठी चक्क अख्खं थिएटर बुक केलंय. स्वतः प्रवीण तरडे यांनी पोस्ट करुन यासंदर्भात माहिती दिलीय. 

पुण्याचे शरदचंद्र पवार गटाचे आमदार बापूसाहेब पठारे आणि त्यांचा मुलगा सुरेंद्र पठारे यांनी ‘देऊळ बंद 2’ सिनेमाची तब्बल 1500 तिकिटं खरेदी केली. आपल्या प्रभागातील लोकांसाठी त्यांनी ही तिकिटं खरेदी केली. प्रविण तरडेंनी थिएटरमधला व्हिडीओ शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. तसेच, आमदार बापूसाहेब पठारे यांचे आभारही मानले आहेत. यावेळी स्वतः बुक केलेल्या थिएटरमध्ये आमदार बापूसाहेब पठारे यांनी स्वतः लोकांसोबत सिनेमा पाहिला. 

प्रवीण तरडे नेमकं काय म्हणालेत? (Pravin Tarde On MLA Bapusaheb Pathare)

व्हिडीओमध्ये प्रवीण तरडे म्हणालेत की, “हे असे पहिले आमदार आहेत, ज्यांनी प्रभागातील लोकांसाठी ‘देऊळ बंद 2’ सिनेमाची 1500 तिकिटं खरेदी केलीत. आम्ही तुमचे खूप आभारी आहोत की, तुम्ही योग्य सिनेमा लोकांना दाखवताय… आमदार साहेब मी तुम्हाला लिहून देतो की, ही माणसं तुम्हाला अभिमानानं सांगतील की, आमचं जगणं बदलणारा सिनेमा तुम्ही आम्हाला दाखवलाय… धन्यवाद…”

दरम्यान, प्रवीण तरडेंचं दिग्दर्शन असलेल्या ‘देऊळ बंद 2’ सिनेमाची रिलीजआधीपासूनच चांगली चर्चा होती. हा सिनेमा रिलीज झाल्यावर प्रेक्षकांनी थिएटरमध्ये हाऊसफुल्ल गर्दी केली. 21 मे रोजी ब्रह्ममुहुर्तावर प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय.  या सिनेमात ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांनी श्री स्वामी समर्थांची भूमिका साकारली आहे. तर, अभिनेत्री स्नेहल तरडे शेतकरी महिलेच्या भूमिकेत दिसल्यात. याव्यतिरिक्त सिनेमात रमेश परदेशी, सविता मालपेकर, मंगेश देसाई यांसारख्या कलाकारांनीही मुख्य भूमिका साकारल्या आहेत. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Ravi Kishan On Sanchita Ugale Death Case: ‘…त्यामुळे आत्म्याला कधीही मुक्ती मिळत नाही’; संचिता उगलेनं उचललेल्या टोकाच्या पावलावर रवि किशन नेमकं काय म्हणाले?

ABP Majha च्या बातम्या LIVE: 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *