सिराजनंतर टीम इंडियाचे आणखी दोन खेळाडू बनणार DSP, बॉलरसोबत आता गुन्हेगारांचीही धुलाई करणार | क्रीडा बातम्या (Sports News in Marathi)


Last Updated:

टीम इंडियाच्या आणखी दोन खेळाडूंनी डीएसपी या पदावर नियुक्ती होणार आहे. त्यामुळे आता टीम इंडियाचे डीएसपी बनणारे आणखी दोन खेळाडू कोण आहेत? हे जाणून घेऊयात.

News18
News18

Team India : टीम इंडियाचा स्टार खेळाडू मोहम्मद सिराज हा क्रिकेटसोबत पोलीस उपअधीक्षक म्हणजेच DSP आहे. टीम इंडियाच्या संघातील तो एकमेव असा खेळाडू आहे, जो पोलीस सेवेत आहे. पण आता त्याच्या जोडीला आणखी दोन नाव जोडली जाणार आहे. कारण टीम इंडियाच्या आणखी दोन खेळाडूंनी डीएसपी या पदावर नियुक्ती होणार आहे. त्यामुळे आता टीम इंडियाचे डीएसपी बनणारे आणखी दोन खेळाडू कोण आहेत? हे जाणून घेऊयात.

आपल्या वेग आणि स्विंगच्या जोरावर भारतीय क्रिकेट संघात आपले स्थान निर्माण केलेले वेगवान गोलंदाज मुकेश कुमार आणि आकाश दीप लवकरच पोलिसांच्या गणवेशात दिसणार आहेत. बिहार सरकारने या दोन दिग्गज क्रिकेटपटूंना क्रीडा कोट्याअंतर्गत पोलीस उपअधीक्षक पदावर नियुक्त करण्याची शिफारस केली आहे. आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत स्तरावरील त्यांची उत्कृष्ट कामगिरी लक्षात घेता, या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली असून पुढील अधिकृत प्रक्रियेसाठी तो गृह विभागाकडे पाठवण्यात आला आहे.

मुकेश कुमार आणि आकाश दीप या दोघांचीही कहाणी बिहारमध्ये रुजलेली आहे आणि दोघांनीही प्रचंड संघर्षानंतर हे पद मिळवले आहे. बिहारमधील गोपालगंजचे रहिवासी असलेले मुकेश कुमार एकेकाळी अत्यंत गरिबीत जगत होते.त्यांचे वडील कोलकात्यात ऑटो-रिक्षा चालवायचे. यावेळी कोणत्याही विशेष साधनांशिवाय मुकेश यांनी आपल्या गोलंदाजीचे कौशल्य विकसित केले. देशांतर्गत क्रिकेटमध्ये बंगालसाठी उत्कृष्ट कामगिरी केल्यानंतर, त्यांनी भारतीय संघात तिन्ही फॉरमॅटमध्ये (कसोटी, एकदिवसीय आणि टी-२०) स्थान मिळवले.

आकाश दीपची स्टोरी चित्रपटापेक्षा कमी नाही

बिहारमधील सासाराम (रोहतास) येथील रहिवासी असलेल्या आकाश दीपची कहाणी एखाद्या चित्रपटापेक्षा कमी नाही. त्याच्या कुटुंबाने एकेकाळी त्याच्या क्रिकेट खेळण्यास विरोध केला होता, पण त्याची आवड कायम राहिली. आपल्या वेगवान गोलंदाजीमुळे त्याला आयपीएलमध्ये आणि नंतर भारतीय कसोटी संघात स्थान मिळाले, जिथे त्याने आपल्या भेदक गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केले.

गेल्या काही काळापासून, बिहार सरकार राज्यात खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी “पदक आणा, नोकरी मिळवा” यांसारख्या धोरणांवर काम करत आहे. मुकेश कुमार आणि आकाश दीप यांनी केवळ बिहारलाच नव्हे, तर जागतिक स्तरावर संपूर्ण देशाला गौरव मिळवून दिला आहे.

क्रीडा विभागाने या शिफारशीला मंजुरी दिल्याने, आता चेंडू गृह विभागाच्या कोर्टात आहे. गृह विभाग कागदपत्रांची पडताळणी करून आणि इतर आवश्यक औपचारिकता पूर्ण केल्यानंतर, दोन्ही खेळाडूंच्या नियुक्तीचे अधिकृत आदेश लवकरच जारी केले जातील.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *