Last Updated:
Mumbai Shocking News : गोरेगाव पूर्व येथे मोहरमनिमित्त कब्रस्तानात जाऊन परतणाऱ्या 67 वर्षीय महिलेसोबत असं काही घडेल याची कल्पनाही कोणी केली नाही. नक्की काय घडलं महिलेसोबत सविस्तर जाणून घेऊयात.
मुंबई : मुंबई शहरात भदुपारी घडलेल्या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. जिथं एक धार्मिक कार्यक्रम आटोपून घरी परतत असलेल्या ज्येष्ठ महिलेसोबत क्षणात दुर्देवी घटना घडते. या घडलेल्या प्रकारामुळे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळतो.
मिळालेल्या माहितीनुसार, मिळालेल्या माहितीनुसार संपूर्ण घटना ही मुंबईतील गोरेगाव पूर्व परिसरात घडली आहे. जिथं रेहाना मोहम्मद बाकीर काचवाला (वय67) या मोहरमनिमित्ताने आपल्या नणंद आणि नात यांच्यासह म्युनिसिपल मुस्लिम कब्रस्तानात गेल्या होत्या. जिथं त्यांनी त्यांच्या आईच्या कबरीजवळ जाऊन फुले अर्पण केली आणि प्रार्थना केली.
कब्रस्तानातून परत तिघं परतत असताना सबवेच्या दिशेने जाण्यासाठी रस्ता ओलांडत होत्या. दरम्यान याच वेळी त्यांची नंणद आणि नात पुढे होत्या तर रेहाना या त्यांच्या मागून येत रस्ता ओलांडत होत्या. पण या क्षणात अंधेरीच्या दिशेने भरधाव वेगाने येत असलेल्या एका कारने रेहाना यांना जोरदार धडक दिली.
कारच्या धडकेमुळे रेहाना या गंभीर जखमी झाल्या. भरदिवसा घडलेल्या या प्रकारामुळे रस्त्यावर नागरिकांची वर्दळ होती. त्यातीलच काही नागरिकांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले आणि त्यांच्यावर उपचारही सुरु झाले. पण अपघात भीषण असल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
रेहाना यांच्या अपघाताची माहिती मिळताच वनराई पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला. सध्या पोलीस तपासादरम्यान संबंधित कारचालकाची ओळख ही पटली असू त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Mumbai,Maharashtra
आईच्या कबरीचे दर्शन घेऊन लेक परतली; घरी जाण्यापूर्वीच कुटुंबीय हादरले; काळजाचा थरकाप उडवणारी घटना
