‘ही’ 10 रूपयांची छोटी वस्तू वाढवते तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारशक्ती ते ही नैसर्गिकरित्या, जाणून घ्या त्याचे फायदे – Marathi News | This small item boosts your bodys immunity and does so naturally learn about its benefits


तुमची पचनशक्ती कमजोर असेल किंवा हवामानातील बदलांमुळे तुम्हाला सहज सर्दी-खोकला होत असेल, तर हे कमकुवत प्रतिकारशक्तीचे लक्षण आहेत. त्यातच पावसाळा सुरू झाला आहे या हंगामात आरोग्याची काळजी घेण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती मजबूत असणे खूप महत्वाचे आहे. तर शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आयुर्वेदिक पद्धती देखील खूप उपयुक्त आहेत.

आयुर्वेद तज्ञांच्या मते, रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी काळीमिरी सर्वात उत्तम उपाय आहे. कारण काळ्या मिरीमध्ये पायपेरिन नावाचे अँटिऑक्सिडंट एक औषधी वनस्पती म्हणून काम करते. आपल्या आहारात काळी मिरीचा समावेश केल्याने तुमची रोगप्रतिकारशक्ती नैसर्गिकरित्या वाढते. चला तर मग आजच्या लेखात रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी काळ्या मिरीचा वापर कसा करू शकतो आणि त्याचे फायदे देखील जाणून घेऊयात.

काळी मिरी नैसर्गिकरित्या वात, पित्त आणि कफ दोषांना संतुलित करू शकते. तर काळीमिरीमध्ये संत्र्यांपेक्षा जास्त व्हिटॅमिन सी असते. एनसीबीआयच्या संशोधनातही असे म्हटले आहे की, काळी मिरी व्हिटॅमिन सीचा एक समृद्ध स्रोत आहे. त्यामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी ती अत्यंत प्रभावी आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, तिचे गुणधर्म तुमच्या शरीरात ऊर्जा टिकवून ठेवतात आणि तुम्हाला आजारांपासून दूर ठेवतात.

हे लक्षात ठेवणेही महत्त्वाचे आहे की या पदार्थांचे सेवन हंगामानुसार केले पाहिजे. हिवाळ्यात माफक प्रमाणात सेवन केल्यास शरीराला कोणतेही नुकसान होत नाही, परंतु उन्हाळ्यात त्याचे अतिसेवन हानिकारक ठरू शकते. म्हणून काळी मिरी माफक प्रमाणात सेवन करा आणि निरोगी राहा.

काळी मिरीचे काही औषधी गुणधर्म

पचनक्रिया सुधारणे: यातील अँटिऑक्सिडंट गुणधर्म तुमचे पोट स्वच्छ करण्यास आणि पचनक्रिया जलद करण्यास मदत करतात.

वात, पित्त आणि कफ यांचा समतोल: काळी मिरी तिच्या उष्ण स्वभावामुळे वात आणि कफ शांत करते.

‍लिवर निरोगी ठेवणे: काळी मिरी ‍लिवरमधून हानिकारक पदार्थ (विषारी द्रव्ये) काढून टाकण्यास मदत करते, ज्यामुळे ते सुरळीत आणि अधिक प्रभावीपणे कार्य करू शकते.

पोटातील जंत काढण्यासाठी फायदेशीर: आयुर्वेदात काळी मिरी एक उत्कृष्ट ‘कृमिनाशक’ औषध मानली जाते, ज्यामुळे ती पोटातील जंत नष्ट करते.

दम्यावर प्रभावी: काळ्यामिरीच्या उष्ण स्वभावामुळे आणि दाहक-विरोधी गुणधर्मांमुळे छातीत साचलेला कफ काढून टाकते, ज्यामुळे दमा, जुनाट खोकला आणि श्वास घेण्याच्या त्रासात मोठा आराम मिळतो.

काळ्या मिरीचा वापर किती प्रमाणात करावा?

तज्ज्ञांच्या मते, काळी मिरी उष्ण असते, ज्यामुळे शरीरात उष्णता निर्माण होते, म्हणून तिचे सेवन प्रमाणात करणे फायदेशीर ठरते. आपल्या जेवणात फक्त 1 किंवा 2 चिमूट काळी मिरी वापरा.

काळी मिरी जास्त प्रमाणात खाण्याचे तोटे

काळी मिरी हे एक आयुर्वेदिक औषध आहे, योग्य प्रमाणात त्याचे सेवन केल्यास तुम्ही निरोगी राहू शकता, परंतु त्याचे अतिसेवन केल्यास तुमच्या शरीरावर दुष्परिणामही होऊ शकतात.

शरीरातील उष्णतेत वाढ: काळीमिरीचा उष्ण स्वभावामुळे जर तुम्ही जास्त प्रमाणात सेवन केल्यास शरीराचे तापमान वाढू शकते.

छातीत जळजळ: ज्यांची पचनसंस्था संवेदनशील आहे किंवा ज्यांना अल्सरचा त्रास आहे, त्यांना काळीमिरीच्या अतीसेवनाने छातीत जळजळ आणि पोटदुखी होऊ शकते.

त्वचेच्या समस्या: जास्त प्रमाणात काळी मिरी खाल्ल्याने चेहऱ्यावर पुरळ, मुरुमे किंवा पुरळ येऊ शकते.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *