चिमुकलीच्या पोटात लाथ मारणारी ती अंगणवाडी सेविका नव्हेच, महिलेची खरी ओळख कळाल्यास अंगावर काटा येईल, VIRAL VIDEO | मुंबई बातम्या (Mumbai News)


Last Updated:

एका महिलेने एका चिमुकलीच्या पोटात लाथ मारल्याची घटना घडली होती. विशेष म्हणजे ही घटना अंगणवाडीच्या बाहेर घडल्याने अंगणवाडीतल्या सेविकेने त्या चिमुरडीला लाथ मारल्याचा समज अनेकांचा झाला होता. पण आता व्हायरल व्हिडिओ मागचं खरं सत्य समोर आलं आहे.

News18
News18

Panvel News : सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात.असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये एका महिलेने एका चिमुकलीच्या पोटात लाथ मारल्याची घटना घडली होती. विशेष म्हणजे ही घटना अंगणवाडीच्या बाहेर घडल्याने अंगणवाडीतल्या सेविकेने त्या चिमुरडीला लाथ मारल्याचा समज अनेकांचा झाला होता. पण आता व्हायरल व्हिडिओ मागचं खरं सत्य समोर आलं आहे.

पनवेल तालुक्यातील नांदगाव परिसरात ही घटना घडली होती. अंगणवाडी जाण्यास एका चिमुकली टाळाटाळ करत होती त्यामुळे एका महिलने चिमुरडीच्या पोटात लाथ मारली होती.ही घटना घडल्यानंतर अंगणवाडीतून एक महिला बाहेर आली आणि त्या चिमुरडीला आत घेऊन गेली. हा व्हिडिओ घटनास्थळी उभ्या असलेल्या एका व्यक्तीने मोबाईलला कैद केला आणि सोशल मीडियावर व्हायरल केला होता.

हा व्हिडिओ व्हायरल होताच मोठा वाद पेटला होता. अनेकांनी अंगणवाडीतील सेविकाच्या वागणुकीवर संताप व्यक्त केला होता. तसेच या प्रकरणात अंगणवाडीतील सेविकेनेच चिमुकलीला लाथ मारल्याचा आरोप झाला होता. यावरून प्रचंड टीकाही झाली होती.पण आता या प्रकरणात मोठा खुलासा समोर आला आहे.

चिमुकलीच्या पोटात लाथ मारणारी ती महिला अंगणवाडीची सेविका नसून तिची आई आहे. आपली मुलगी शाळेत जात नसल्याने तिने रागाच्या भरात तिला लाथ मारली होती. पण अंगणवाडीच्या बाहेर ही घटना घडल्याने हा सगळा आरोप अंगणवाडीच्या सेविकेवर झाला होता. पण संबंधित घटनेत अंगणवाडी सेविकेचा काही संबंध नसून ही घटना त्या मुलीच्या आईकडून घडल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अंगणवाडी सेविकेवर झालेले आरोप खोटे असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान या प्रकरणात आता संबंधित पती पत्नी या प्रकाराबाबत दिलगिरी व्यक्त करत माफी मागितली आहे. भविष्यात अशा घटना घडणार नाही,अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

मराठी बातम्या/मुंबई/

चिमुकलीच्या पोटात लाथ मारणारी ती अंगणवाडी सेविका नव्हेच, महिलेची खरी ओळख कळाल्यास अंगावर काटा येईल, VIRAL VIDEO



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *