Abhimanyu Pawar On Medha kulkarni: खासदार मेधा कुलकर्णी कार्यक्रमातून निघून गेल्या; अभिमन्यू पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, जातीचा विषय नाही…


पुणे :  पुण्यातील (Pune) एका कार्यक्रमात भाजप खासदार आणि आमदार यांच्यातील राजकीय नाराजीनाट्य दिसून आले. पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते युपीएससी, एमपीएससी उपक्रमातील यशस्वी विद्यार्थी व पालकांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात व्यासपीठावर पहिल्या रांगेत बसण्यावरुन हे नाराजीनाट्य रंगल्याचं दिसून आलं. मात्र, आमदार अभिमन्यू पवार यांनी खासदार मेधा कुलकर्णी (Medha kulkarni) यांना टोमणा मारल्याने त्यांचा राग अनावर झाला आणि त्यांनी कार्यक्रमातून काढता पाय घेतला. तर, मी जातीचा विषय किंवा वाद काढलाच नाही, असे अभिमन्यू पवार यांनी म्हटलं. (Abhimanyu Pawar On Medha kulkarni)

त्यानंतर आमदार अभिमन्यू पवार यांनी दिलगिरी व्यक्त केली. ताईंचा गैरसमज झाला आहे. मी त्यांना एवढेच म्हणलं की, नरेंद्र पाटील पुढे बसतील. कारण ते अण्णासाहेब विकास महामंडळाचे अध्यक्ष आहेत. आपण दोघं मागे बसू. मी त्यांना एवढेच बोललो आहे. यात कुठल्याही जातीचा विषय किंवा वाद नाही. मी काय बोललो ताईला तरी देखील विनंती करतो की, तुम्ही मी काय बोललो ते आठवून बघा. हा कार्यक्रम माझ्या घरचा नाही, त्या माझ्या पक्षाच्या नेत्या आहेत, वरिष्ठ आहेत, यानंतर देखील माझ्या वक्तव्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो. तर कार्यक्रमातून निघून जावं की बसावं हा त्यांचा विषय आहे, असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे. पुढे एकच खुर्ची रिकामी होती म्हणून त्यांना विनंती केली होती, असंही त्यांनी म्हटलं आहे. (Abhimanyu Pawar On Medha kulkarni)

Abhimanyu Pawar On Medha kulkarni:  नेमकं काय घडलं?

खासदार मेधा कुलकर्णी यांना कार्यक्रमात पहिल्या रांगेत बसण्यावरून अभिमन्यू पवार यांनी टोमणा मारला. मराठ्यांच्या कार्यक्रमात तुम्ही पहिल्या रांगेत बसणं बरं दिसत नाही म्हणताच मेधा कुलकर्णींनी रागात कार्यक्रम सोडला, त्या भर कार्यक्रमातून निघून गेल्याचं दिसून आलं. त्यामुळे, राजकीय वर्तुळात आणि कार्यक्रमस्थळी या घटनेची चांगलीच चर्चा रंगली.  दरम्यान, या कार्यक्रमानंतर आमदार अभिमन्यू पवार यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. ताईंचा गैरसमज झाला आहे, मी त्यांना एवढेच म्हटलं की नरेंद्र पाटील पुढे बसतील. कारण, ते अण्णासाहेब विकास महामंडळाचे अध्यक्ष आहेत. आपण दोघं मागे बसू मी त्यांना एवढेच बोललो आहे, यात कुठल्याही जातीचा विषय किंवा वाद नाही, असे स्पष्टीकरण अभिमन्यू पवार यांनी दिले.  (Abhimanyu Pawar On Medha kulkarni)

हेदेखील वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *