Maharashtra Rain Updates : गेल्या काही दिवसांपासून दांडी मारलेल्या पावसाने (Maharashtra Rain) पुन्हा एकदा दमदार पुनरागमन केलं आहे. राज्यातील बहुतांश भागात पावसाच्या सरी कोसळत असून पुढील काही तासात मान्सून सक्रिय होणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. विशेषत: कोकण विभागात पुढील काही तास हे महत्त्वाचे मानले (Maharashtra Weather Forecast)जात असून पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे,तर तिकडे मुंबई आणि पूर्व उपनगरात मुसळधार पाऊस सुरू आहे. घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड, पवईमध्ये धुवांधार पावसाच्या सरी कोसळत असल्याचे चित्र आहे. तर राज्यातील 23 जिल्ह्यांना आज पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर 5 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट वर्तवला आहे. (Weather Forecast)
Weather Forecast: राज्यातील 23 जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट, 5 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
दरम्यान, आजपासून पुढील तीन दिवस राज्यातील काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची तर काही भागात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. आजही राज्यातील बहुतांश भागांना हवामान विभागाकडून ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. यात मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यांना आज, मंगळवारी यलो अॅलर्ट देण्यात आला आहे. तर रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये मात्र ऑरेंज देण्यात आला आहे. तर तिकडे विदर्भातील अकोला, बुलढाणा आणि वाशिम या जिल्ह्यांत कोरड्या हवामानाचा अंदाज आहे. अमरावती जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तसेच गोंदिया, नागपूर, वर्धा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह मान्सून दाखल होणार आहे. याच जिल्ह्यांना मान्सूनचा यलो अलर्ट वर्तवला आहे. मराठवाडा विभागात छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह मान्सूनचा यलो अलर्ट वर्तवण्यात आला.
Nagpur Rain: पावसाने उसंत घेतल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ
100 मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस झाल्या शिवाय पेरणी करू नका असे कृषी विभागाकडून वारंवार सांगितले जात असतांना देखील जूनच्या तिसऱ्या आठवड्यात पाऊस झाल्या नंतर नागपूर जिल्ह्यातील कुही, भिवापूर व उमरेड तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी पेरणी केली . मात्र आता पावसाने उसंत घेतल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली. तर काही शेतकऱ्यांनी दुबार पेरणी देखील सुरु केली. यात कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा मोठ्याप्रमाणात सहभाग आहे. दुबार पेरणीमुळे शेतकऱ्यांना काही हजार रुपयांचा फटका बसत आहे.
दरम्यान, काल (30 जून) संध्याकाळी नागपूरच्या काही भागात झालेल्या मध्यम ते तीव्र स्वरूपाच्या पावसामुळे अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचले होते. त्यामुळे महापालिकेने राबवलेल्या मान्सूनपूर्व स्वच्छता मोहिमेची पोलखोल तर झालीच. मात्र सिव्हिल लाईन्स परिसरात महापालिकेच्या आवारात सुद्धा बराच वेळ पाणी साचले होते. त्यामुळे महापालिका मान्सूनच्या या पहिल्या दमदार पावसामध्ये स्वतःचेही रक्षण करू शकत नाही का? असा प्रश्न नागरिकांच्या मनात निर्माण झाला आहे.
Hingoli News : मान्सूनच्या प्रतीक्षेत खरिपाची पेरणी लांबणीवर
हिंगोली जिल्ह्यावर यंदा एल निनोचा प्रभाव स्पष्टपणे जाणवत आहे. दरवर्षी मृग नक्षत्रात पेरणीयोग्य पाऊस होत असताना यंदा मात्र जून महिना संपत आला तरी समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. मात्र काही दिवसांपूर्वी झालेल्या जोरदार पावसानंतर जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये शेतकऱ्यांनी पेरणीच्या कामांना वेग दिला आहे.
यंदा हिंगोली जिल्ह्यात सुमारे 4 लाख 7 हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. सध्या जिल्ह्यात सर्वत्र ट्रॅक्टर, पेरणी यंत्रे आणि बैलजोडीच्या साहाय्याने पेरणीची लगबग सुरू असून शेतात बळीराजा दिवसरात्र मेहनत घेताना दिसत आहे. उशिराने पेरण्या सुरु झाल्याने उत्पन्नात काहीशी घट होण्याची शक्यता असून पाऊस पुन्हा नियमितपणे बरसला तर पिकांची उगवण चांगली होईल, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत
Zero Hour : नसरापुरातील प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा, निकालानं गुन्हेगारांवर वचक बसेल असं वाटतं का?