सगळे झोपेत असताना FIFA मध्ये उटलफेर! डिफेन्डिंग फायनलिस्ट ‘जर्मनी’ World Cup मधून बाहेर, 96 व्या मिनिटाला गोल मारत ब्राझीलची थाटात एन्ट्री | क्रीडा बातम्या (Sports News in Marathi)


Last Updated:

Germany Knocked Out of Fifa World Cup : युरोपीय बलाढ्य जर्मनी संघाला 4-3 असा धक्कादायक पराभव पत्करावा लागला. तर दुसरीकडे ब्राझीलने 96 व्या मिनिटाला गोल करत आपलं आगामी फेरीतील स्थान पक्कं केलं आहे.

Germany Knocked Out of Fifa World Cup 2026 Martinelli 96th minute goa
Germany Knocked Out of Fifa World Cup 2026 Martinelli 96th minute goa

Brazil Martinelli 96th minute goal : सध्या संपूर्ण जगात फिफा वर्ल्ड कपची क्रेझ पहायला मिळत आहे. अशातच काल जेव्हा तुम्ही सगळे साखरझोपेत असताना मोठा उलटफेर पहायला मिळाला. चार वेळचा चॅम्पियन जर्मनी यंदाच्या फिफा विश्वचषकातून बाहेर पडली आहे. तुम्हाला आठवत असेल तर मागील फिफा वर्ल्ड कपमध्ये जर्मनी डिफेन्डिंग फायनलिस्ट होती. राऊंडर ऑफ 32 च्या फेरीत पॅराग्वेविरुद्ध पेनल्टी शूटआऊटमध्ये या युरोपीय बलाढ्य जर्मनी संघाला 4-3 असा धक्कादायक पराभव पत्करावा लागला. तर दुसरीकडे ब्राझीलने 96 व्या मिनिटाला गोल करत आपलं आगामी फेरीतील स्थान पक्कं केलं आहे.

इतिहासातील पहिला वर्ल्ड कप नॉकआऊट विजय

मंगळवारी खेळल्या गेलेल्या या सामन्यात, अतिरिक्त वेळेनंतर स्कोअर 1-1 असा बरोबर होता. पेनल्टी शूटआऊटमध्ये काय हावर्ट्झ, निक वोल्टेमाडे आणि जोनाथन टाह यांना आपले शॉट्स गोलमध्ये रूपांतरित करता आले नाहीत. पॅराग्वेसाठी अँटोनियो सॅनाब्रिया आणि फॅबियन बाल्बुएना यांनी पेनल्टी चुकवल्या, परंतु सडन डेथमध्ये जोस कॅनालेने निर्णायक पेनल्टीवर गोल करून पॅराग्वेला इतिहासातील पहिला वर्ल्ड कप नॉकआऊट विजय मिळवून दिला.

96 व्या मिनिटाला नाट्यमय विजय

तर दुसरीकडे ब्राझीलने कमाल केली. ब्राझील आणि जपान यांच्यात झालेल्या मॅचमध्ये गॅब्रिएल मार्टिनेलीने एक्स्ट्रा टाईममध्ये म्हणजेच 96 व्या मिनिटाला नाट्यमय विजयी गोल करत ब्राझीलला दुसऱ्या हाफमध्ये रोमांचक पुनरागमन करण्यास मदत केली आणि जपानला 2-1 ने पराभूत करून राऊंड ऑफ 16 मध्ये एन्ट्री मिळवली आहे. त्यानंतर आता त्याचे व्हि़ीडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

कॅनडाचा राऊंड ऑफ 16 मध्ये प्रवेश

दरम्यान, तसेच राऊंड ऑफ 32 च्या पहिल्या मॅचमध्ये कॅनडाने कमाल केली. तगड्या साऊथ अफ्रिकेचा पराभव करून कॅनडा राऊंड ऑफ 16 मध्ये प्रवेश केला आहे. कॅनडाने साऊथ अफ्रिकेचा 1-0 ने पराभव केला अन् सर्वांना चकित केलं.

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/

सगळे झोपेत असताना FIFA मध्ये उटलफेर! डिफेन्डिंग फायनलिस्ट ‘जर्मनी’ World Cup मधून बाहेर, 96 व्या मिनिटाला गोल मारत ब्राझीलची थाटात एन्ट्री



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *