तुझ्या बहिणीने केलेली बलात्काराची केस मागे घे नाही तर… बीडमध्ये धक्कादायक घटना, थेट भावालाच.. – Marathi News | 1 young man was subjected to a life threatening attack by five individuals in Beed CCTV video of the incident has gone viral.


तुझ्या बहिणीने केलेली बलात्काराची केस मागे का घेत नाहीस ? असे म्हणत पाच जणांकडून तरुणावर प्राणघातक हल्ला‌ करण्यात आला. या घटनेने मोठी खळबळ उडाली. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला. एका महिन्यानंतरही आरोपी मोकाट असल्याची पीडित तरुणाच्या आईनी तक्रार केली. सराईत गुन्हेगार असूनही त्याच्यावर कारवाई होत नाही. गुन्हा दाखल असूनही त्याला कोणी अटक करत नाही म्हणत पीडितेच्या आईने थेट बीडच्या पोलिस अधिक्षकांकडे तक्रार दाखल केली. हल्ल्याचे सीसीटीव्ही समोर आले. आरोपी वारंवार परत येऊन रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तरुणाला क्रुरपणे मारत असल्याचे दिसत आहे. अंगावर थरकाप उडवणारा हा व्हिडीओ आहे.

बीडच्या गेवराई शहरालगत 26 मे रोजी रात्री मंगेश भुराजी शिंदे नामक तरुणावर तुझ्या बहिणीने माझ्यावर केलेली बलात्काराची केस मागे का घेत नाहीस? असे म्हणत प्राणघातक हल्ला करण्यात आला. हल्लेखोरांनी मंगेशच्या मित्राला पिस्तूलचा धाक दाखवून पळवून लावले. त्यानंतर आरोपींनी मंगेशवर कुऱ्हाड, चाकू आणि लोखंडी रॉडने वार करत दगडाने ठेचत गंभीर जखमी केले.

जखमी मंगेशवर बीड येथील सरकारी रुग्णालयावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी या प्रकरणात सचिन राठोड, अरबाज शेख आणि इतर तीन अनोळखी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. यातील आरोपी अद्याप मोकाट आहेत, ते सराईत एक गुन्हेगार आहेत, त्यांच्यापासून आम्हाला धोका आहे तरी त्यांना तात्काळ अटक करावी अशी तक्रार पीडित तरुणाच्या आईने बीडच्या पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.

दरम्यान हल्ल्याचा सीसीटीव्ही देखील समोर आला असून यामध्ये आरोपी तरुणाला अतिशय क्रुरपणे मारत असल्याचे दिसत आहे. रात्रीच्या अंधारात वारंवार बारी-बारीने परत येऊन रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तरुणाला दगडाने ठेचत असल्याचे दिसत आहे. या व्हिडीओने मोठी खळबळ उडाली. बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा गुन्हेगारी डोकेवर काढताना दिसत आहे. केजमध्ये विलास घुले याची हत्या करण्यात आली. टोळक्याने विलास घुलेवर हल्ला चढवला. या प्रकरणात थेट बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांच्या मुलाने नाव आले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *