Petrol Diesel Rates : टेन्शन टेन्शन.. कच्च्या तेलाचे पुन्हा वाढले भाव, भारतात पेट्रोल- डिझेलची किंमत… – Marathi News | Crude Oil Prices Soar, Iraq Threatens OPEC Exit; What It Means for India Fuel Prices ?


आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वेगाने वाढताना दिसत आहेत; आखाती देशांमधील कच्च्या तेलाचा व्यापार प्रति बॅरल 73 डॉलर्स या किमतीच्या वर होत आहे. तर अमेरिकेतील कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल 70 डॉलर्सच्या वर पोहोचल्या आहेत. दरम्यान, इराकककडून सातत्याने ‘ओपेक’कडे (OPEC) आपला कोटा वाढवण्याची मागणी केली जात आहे. आणि ही मागणी मान्य न झाल्यास संघटनेतून बाहेर पडण्याची धमकीही त्यांनी दिली ​​आहे. यावरून मध्य पूर्वेमध्ये एका नवीन संघर्षाची सुरुवात होत असल्याचे संकेत दिसून येत आहेत.

पण जर इराकने ‘ओपेक’ (OPEC) मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला, तर मध्य पूर्वेत किमतींचे नवे युद्ध पुन्हा पेटेल आणि त्यामुळे कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण होईल. तसेच सौदी अरेबियाचे वर्चस्वही बऱ्याच अंशी कमकुवत होईल. भारताचा विचार करायचा झाला तर , गेल्या एका महिन्याहून अधिक काळापासून देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. चला, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेपासून ते भारतामधील इंधनाच्या सध्याच्या दरांवर एक नजर टाकूया.

कच्च्या तेलाची किंमत

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव गेल्या काही दिवसांच्या तुलनेत सध्या अधिक आहेत. ब्लूमबर्गच्या आकडेवारीनुसार, आखाती देशांमधील कच्च्या तेलाचा व्यापार प्रति बॅरल 73.15 डॉलर्स दराने होत असून, त्यामध्ये 1.61 टक्क्यांची वाढ झाली . मात्र, जून महिन्यात आखाती कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण झाली होती. दुसरीकडे, अमेरिकन कच्च्या तेलाच्या दरात मात्र घट झाली आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, कच्च्या तेलाची किंम 70.29 डॉलर्स प्रति बॅरल इतकी असून त्यात 0.65 क्क्यांची घट झाली आहे. काही दिवसांपासून अमेरिकन तेलाचा व्यवहार 70 डॉलर्स प्रति बॅरलपेक्षा कमी दराने सुरू होता. आगामी काळात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये चढ-उतार पाहायला मिळू शकतात, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

भारतात पेट्रोल- डिझेलचे दर

आता भारतातील इंधनाचे दर जाणून घेऊया. भारतात गेल्या 36 दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. या दरांमध्ये शेवटची वाढ 25 मे रोजी झाली होती. कच्च्या तेलाच्या किमतीत सुरू असलेली घसरण पाहता, पेट्रोल आणि डिझेलचे दर जैसे-थे राहण्याची शक्यता असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. दिल्लीमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर अनुक्रमे 102.12 रुपये आणि 95.20 रुपये प्रति लिटर इतके आहेत.

तर कोलकाता येथे पेट्रोलचा दर प्रति लिटर 113.51 रुपये असून एक लिटर डिझेलसाठी 99.82 रुपये मोजावे लागत आहेत. मुंबईत पेट्रोल आणि डिझेलचे दर अनुक्रमे प्रति लिटर 111.21 आणि 97.83 रुपये आहेत. तर , चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 107.77 आणि डिझेलचा दर प्रति लिटर 99.55 रुपये किमतीवर पोहोचला आहे. विशेष म्हणजे, मे महिन्यात इंधनाच्या दरांमध्ये 7ते 8 टक्क्यांनी वाढ झाली होती.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *