Kangana Ranaut Bite Vir Das Lip While Kissing Scene: बॉलिवूडचं (Bollywood News) अख्खं जग जेवढं दिसतं तेवढं ग्लॅमरस अजिबात नाही. इथे अनेक गोष्टी पडद्यावर आणि पडद्याआड घडत असतात. बॉलिवूड सेलिब्रिटींबाबत (Bollywood Celebrities) अनेक गोष्टीही आपण ऐकतो. काही खऱ्या असतात, तर काही निव्वळ अफवा. बॉलिवूडमधील सेलिब्रिटींबाबत अनेकदा असे दावे केले जातात की, ज्यावर पहिल्या नजरेत विश्वास बसत नाही. अलिकडेच, प्रसिद्ध अभिनेत्री आणि भाजप खासदार (BJP MP) कंगना रनौत (Kangana Ranaut) हिच्याबाबत एक धक्कादायक दावा समोर आलाय.
‘रिव्हॉल्व्हर राणी’ (Revolver Rani) सिनेमातील एका ‘किसिंग सीन’दरम्यान कंगना रनौतनं (Kangana Ranaut Kissing Scene) अभिनेता-कॉमेडी कलाकार वीर दास (Actor Vir Das) याचे ओठ चावलेले आणि दिग्दर्शकानं ‘कट’ म्हटल्यानंतरही ती थांबली नव्हती, ती त्याला कीस करतच राहिली. या गोष्टी समोर आल्यानंतर सोशल मीडियावर जोरदार चर्चांना उधाण आवं. अशातच या गोष्टींवर आता स्वतः वीर दासनंच समोर येऊन सत्य सांगितलंय.
खरंच कंगनानं ‘किसिंग सीन’ करताना वीर दासचे ओठ चावलेले? (Kangana Ranaut Vir Das Kissing Scene)
वीर दास आणि कंगना रनौत यांच्याबाबतचा दावा अलिकडेच ज्येष्ठ पत्रकार सिमी चंडोक यांनी सिद्धार्थ कन्नन यांच्या पॉडकास्टवर केलाय. ‘रिव्हॉल्व्हर राणी’च्या शुटिंगबद्दल बोलताना त्या म्हणालेल्या, “रिव्हॉल्व्हर राणी’ सिनेमाच्या शुटिंगवेळी अभिनेता वीर दासला ज्या प्रसंगाला सामोरं जावं लागलं, त्याची आठवण काढताना आजही त्याचे डोळे पाणावू शकतात. या सीनमध्ये कंगनाला वीर दाससोबत एक पॅशनेट KISS करायचं होतं, किस करताना ती इतकी वाहवत गेली की, दिग्दर्शकानं ‘कट’ म्हटल्यानंतरही ती थांबली नाही. हा सीन शूट करताना तिनं बिचाऱ्या वीर दासचे ओठ चावले, कंगनानं त्याचे ओढ एवढे चावून काढले की, त्याच्या ओठांमधून रक्त वाहू लागलेलं…”
वीर दास काय म्हणाला? (Vir Das On Kissing Scene)
अभिनेता वीर दास यानं आता या प्रकरणावर स्पष्टीकरण देत हे पूर्णपणे खोटं असल्याचं म्हटलंय. ट्विटरवरच्या एका पोस्टमध्ये त्यांनी लिहिलंय की, “मी हे स्पष्ट करू इच्छितो की, ही कथा पूर्णपणे काल्पनिक आणि बनावट आहे. कंगना रनौत एक प्रोफेशनल अभिनेत्री आहे आणि ती आजही एक उत्कृष्ट अभिनेत्री आहे, असंच माझं मत आहे. तिच्याबद्दल चुकीच्या गोष्टी पसरवल्या जातायत…”
कंगना नेमकं काय म्हणाली? (Kangana Ranaut On Kissing Scene)
वीर दास यांच्या पोस्टवर कंगना रनौतनंही प्रतिक्रिया दिलीय. वीरचे आभार मानत अभिनेत्रीनं लिहिलंय की, “धन्यवाद वीर, पण ती व्यक्ती कोण आहे? किती किळसवाणं आहे हे, एखादी विचित्र स्त्री तिच्या लैंगिक कल्पना पूर्ण करण्यासाठी आमचा वापर करत असल्याचं दिसतंय. मी तुझं रक्त शोषतेय आणि तू धक्क्यात आहेस, इतकंच काय तर एका दशकानंतरही रडत आहेस? किती विचित्र आहे हे सर्व…”
वीर दास कोण?
वीर दास हे एक अभिनेते आणि स्टँड-अप कॉमेडियन आहेत, तसेच ते संगीतकार म्हणूनही ओळखले जातात. 2023 मध्ये, नेटफ्लिक्सवरील ‘वीर दास: लँडिंग’ (Vir Das: Landing) या कॉमेडी स्पेशलसाठी त्यांना ‘सर्वोत्कृष्ट कॉमेडी सीरिज’ (Best Comedy Series) चा इंटरनॅशनल एमी अवॉर्ड मिळाला. ‘रिव्हॉल्व्हर राणी’ (Revolver Rani) व्यतिरिक्त, तिनं ‘बदमाश कंपनी’ (Badmaash Company), ‘दिल्ली बेली’ (Delhi Belly) आणि ‘गो गोवा गॉन’ (Go Goa Gone) यांसारख्या सिनेमांमध्येही काम केलंय.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Anandache Paan : ‘खोचक रेषा’ या पुस्तकाच्या निमित्ताने लेखक अभिमन्यू कुलकर्णी यांच्यासोबत गप्पा