Maharashtra Heat Stroke: गेल्या काही दिवसांमध्ये विदर्भातील बहुतांश भागांमध्ये उष्णता कमालीची वाढली आहे. विदर्भातील अनेक भागांमध्ये दररोज तापमानाचे (Temperature) नवनवे उच्चांक प्रस्थापित होत आहे. परिणामी उष्माघाताने (Heat Stroke) अनेकांचे जीव गेले आहेत. याचा फटका आता जंगलातील (Forest) प्राण्यांनाही बसताना दिसत आहे. गडचिरोली (Gadchiroli news) जिल्ह्यातील सिरोंचा येथे अचानक 500 वटवाघुळांचा (Bats) मृत्यू झाला आहे. उष्माघातामुळे या वटवाघुळांचा मृत्यू झाला असावा, असा वनविभागाचा प्राथमिक अंदाज आहे. यापैकी काही वटवाघुळांचे मृतदेह वैद्यकीय चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत. (Maharashtra Weather news)
हवामान खात्याकडून मंगळवारी अमरावती , वर्धा , चंद्रपूर व गडचिरोली येथे उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट देण्यात आला. तर नागपूर व अकोला या जिल्ह्यांसाठी उष्णतेचा ऑरेंज अलर्ट (Weather Alert) आहे. काल विदर्भात ब्रह्मपुरी येथे 47.6 अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदवण्यात आले. हे देशातील सर्वोच्च तापमान ठरले. त्यामुळे गरज नसताना नागरिकांनी घराबाहेर पडू नये अशा सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. त्या खालोखाल नागपूर 46.5, गडचिरोली 46.4, गोंदिया 46.1, चंद्रपूर 46, वर्धा 46, अकोला 45.4, अमरावती 45 अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदवण्यात आले.
Tiger Attack: प्रचंड उष्णतेमुळे वाघाच्या वागण्यात बदल, तेंदुपत्ता वेचणाऱ्या महिलांवर हल्ला, चार जणींचा मृत्यू
काही दिवसांपूर्वीच चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी वनपरिक्षेत्रात वाघाच्या हल्यात (Tiger Attack) चार महिलांचा मृत्यू झाला होता. ब्रह्मपुरी (BrahmaPuri) परिसरात तापमानाने 47 अंश सेल्सिअसचा पारा गाठला आहे. या वाढत्या तापमानामुळे वाघ हिंसक झाला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. वाघांना उन्हाचा प्रचंड त्रास होतो. शरीराचे तापमान कमी कण्यासाठी ते पाण्यात असतात. मात्र त्या क्षणी वाघाला शरीराचे तापमान कमी करण्यासाठी पाणी मिळले नसल्याने वाघावर मानसिक ताण व चिडचिडेपणा वाढला असावा. त्यामुळे वाघाने जंगलात तेंदुपत्ता गोळा करण्यासाठी आलेल्या महिलांवर हल्ला केला असावा, असा अंदाज आहे. या वाघाने दोन-तीन नव्हे तर तब्बल 13 महिलांवर एकाचवेळी हल्ला केला. वाघाने इतक्या लोकांवर हल्ला करण्याची ही घटना दुर्मिळ मानली जात आहे. या वाघाला जेरबंद करण्यात आले असून वनविभागाकडून वाघाच्या हिंसक होण्यामागील कारण समजून घेण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
आणखी वाचा
आणखी वाचा