LPG Rate Today: मोठी आनंदवार्ता! घरगुती गॅस सिलेंडर होणार स्वस्त? झरझर उतरणार किंमत? मोठी अपडेट वाचली का? – Marathi News | LPG Rates Today Great news Is the domestic gas cylinder set to become cheaper Will prices drop sharply Have you read the latest update


एलपीजी सिलेंडर किंमतImage Credit source: एजन्सी

LPG Rate Today on July 2: मध्यंतरी व्यावसायिक गॅस दरवाढीने कळस गाठला. अनेक व्यावसायिकांना, हॉटेल, ढाबे चालकांना, चहा टपरीधारकांना त्याचा मोठा फटका बसला. अनेकांनी व्यवसायाला कुलूप लावले. 1 जुलै रोजी सरकारी तेल कंपन्यांनी (OMCs) 19 किलो वजनी व्यावसायिक LPG सिलेंडरच्या भावात 183.50 रुपयांनी कपात केली. पश्चिम आशियातील तणाव थोडा निवळल्यानंतर आणि मुबलक गॅस साठ्यानंतर हा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे. आता घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीही उतरतील का? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. हा निर्णय कधी होणारा याची प्रतिक्षा गृहिणींना लागली आहे.

व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत किती?

सरकारी तेल कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत 183 रुपयांची कपात केली आहे. दिल्लीत व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत 2,930 रुपये, मुंबईत हा भाव 2,884 रुपये इतका आहे. तर पूर्वेतील मोठे शहर कोलकत्तामध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत 3,072 रुपये तर दक्षिणेतील मोठे शहर चेन्नईमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत 3,099 रुपये इतकी आहे.

अमेरिका-इराण तणावामुळे वाढल्या किंमती

अमेरिका-इस्त्रायल आणि इराण यांच्यात तीन महिन्यांहून अधिक काळ युद्ध सुरू होते. पश्चिम आशियात युद्धाचे सावट होते. इराणने होर्मुज समुद्रधुनी (Strait of Hormuz) बंद केली होती. त्यामुळे तेलाचे टँकर आणि कार्गोच्या वाहतुकीवर मोठा परिणाम झाला होता. हा जागतिक ऊर्जा मार्ग असल्याने पुरवठा बाधीत झाला होता. दिल्लीत 19-किलो वजनी LPG सिलेंडरची किंमत मे महिन्यात 3,071.50 रुपयांहून 3,113.50 रुपयांवर पोहचली होती.

घरगुती गॅस सिलेंडर कधी होणार स्वस्त?

सरकारी तेल केपन्या महिन्याच्या पहिल्या तारखेलाच गॅस सिलेंडरची किंमत जाहीर करतात. जागतिक बाजारात दीर्घकाळापासून कच्चा तेलाच्या किंमती स्थिर राहिल्यास मोठा परिणाम होतो. किंमतीत घसरण होते. सध्या कच्चा तेलाच्या किंमतीत कमालीची घसरण झाली आहे. ही घसरण कायम राहिल्यास याच महिन्याच्या अखेरीस अथवा पुढील महिन्यात, ऑगस्टमध्ये एलपीजीच्या किंमतीत घसरण होऊ शकते. तेल कंपन्या किंमतीत कपात करू शकतात. अद्याप सरकारने याविषयीची अधिकृत घोषणा केलेली नाही.

घरगुती गॅस सिलेंडरची किंमत

दिल्ली- 942.00 रुपये

मुंबई- 941.50 रुपये

चेन्नई- 957.50 रूपये

कोलकत्ता– 968.00 रुपये



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *