Lockup Ram Kapoor Trolled: पुन्हा एकदा किसचा किस्सा! राम कपूरने सर्व मर्यादा ओलांडल्या; 20 वर्षांनी लहान असलेल्या अभिनेत्रीला केलं KISS, नेटकरी भडकले


Lockup Ram Kapoor Trolled for kissing: नेटफ्लिक्सवरील ‘लॉक अप 2’ (Lock Upp 2)  या रिअॅलिटी शोची सध्या प्रचंड चर्चा सुरू आहे. या शोमधून बऱ्याच स्पर्धकांनी आपल्या वैयक्तिक आयुष्यातील खुलासे केले. ज्यामुळे केवळ प्रेक्षकांना नाही तर, बऱ्याचदा इंटरनेटवरही (Trolled) खळबळ उडाली आहे.  शोमध्ये टिकून राहण्यासाठी स्पर्धक विविध प्रकारच्या आयडियांचा वापर करत आहेत. काही स्पर्धकांना (Ram Kapoor) विचित्र वक्तव्यांमुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.   तर, काही स्पर्धक स्वत:च्या वागणुकीमुळे ट्रोलिंगचा सामना करत आहेत. अलिकडेच टेलिव्हिजन अॅक्टर  राम कपूर आपल्या बेधडक वक्तव्य आणि कृतिंमुळे चर्चेत आला होता.  त्याचा नुकताच आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. या व्हिडीओ त्यानं असं काही कृत्य केलं, ज्यामुळे लोकांना धक्काच बसला. 

राम कपूर सोशल मीडियात झाला ट्रोल, कारण… (Ram Kapoor Trolled for Kissing Shreya Kalra)

राम कपूरने आपल्या कारकि‍र्दीत टेलिव्हिजन तसेच सिनेमांमध्ये  काम केलं आहे.  टेलिव्हिजन विश्वातून  त्याला खरी ओळख मिळाली.  त्याने टेलिव्हिजनमधून संस्कारी मुलगा आणि पतीची इमेज बनवली. पण त्याचं ‘लॉक अप 2’ मधील रुप पाहून अनेकांना जबरदस्त धक्का बसला.  प्रेक्षकांना राम कपूरकडून बऱ्याच अपेक्षा होत्या. पण वागणुकीमुळे राम कपूरवर प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली. सध्या राम कपूरचा लेटेस्ट एपिसोडमधील एक व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. 

या व्हिडीओत राम कपूरपेक्षा 22 वर्ष लहान असलेल्या श्रेया कालराला किस करत असल्याचं दिसून येत आहे.   होस्ट फराह खान राम कपूरला, तुम्ही टास्क जिंकले आहात, असे सांगते.  आंनदात राम श्रेयाला मिठी मारतो.   तसेच,  हिच्यामुळे शक्य झालं, असं म्हणतो.   यानंतर आनंदाच्या भरात राम  श्रेयाच्या गालावर किस करतो. शोमधील ही क्लिप सोशल मीडियात तुफान व्हायरल होत आहे.  

पण श्रेयाला रिअॅलिटी शोमध्ये गालावर किस केल्यामुळे  राम प्रचंड ट्रोल होत आहे.  काहींनी ट्रोल केलं तर, काहींनी या गोष्टीला इग्नोर केलं.  एका युझरने कमेंट  सेक्शनमध्ये, ‘मर्यादित राहा’, अशी कमेंट केली आहे.  तर, आणखी एकाने, ‘बाकी सगळं ठीक आहे, पण तू श्रेयाला किस का करत आहे?’ तर, काहींनी, ‘राम कपूर आपला आदर गमावत आहे’, असं म्हटलं आहे. श्रेयापूर्वी राम कपूरने लैलाला देखील जबरदस्ती किस केलं होतं. याचा व्हिडीओही सोशल मीडियात तुफान व्हायरल झाला होता. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

‘डॅडी’ अरुण गवळींच्या लेकीचं स्वप्न पूर्ण, राजकारण नाहीतर वकिलीत मारली बाजी, जावई कौतुक करत म्हणाला…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *