Lip Care : ओठांच्या देखभालीसाठी नैसर्गिक उपायांची यादी, घरगुती उपायांनी जपलं जाईल ओठांचं सौंदर्य | लाइफस्टाईल बातम्या


Last Updated:

ओठांचा रंग गुलाबी राहावा, ओठ मऊ राहावेत यासाठी काही साधे घरगुती उपाय करुन पाहता येतील. मध, लिंबू, गुलाब, दूध असे नैसर्गिक उपाय वापरुन ओठ चमकदार दिसतील. याचा वापर कसा करायचा पाहूया.

News18
News18

मुंबई : हवामानातल्या बदलांमुळे त्वचेवर परिणाम होतात. ओठही अनेकदा कोरडे होतात. कोणतंही रसायन न वापरता घरगुती उपायांनी ओठ मऊ आणि गुलाबी राहतील.

ओठांचा रंग गुलाबी राहावा, ओठ मऊ राहावेत यासाठी काही साधे घरगुती उपाय करुन पाहता येतील. मध, लिंबू, गुलाब, दूध असे नैसर्गिक उपाय वापरुन ओठ चमकदार दिसतील. याचा वापर कसा करायचा पाहूया.

नैसर्गिक मध आणि लिंबू – मधामुळे ओठांना मॉइश्चर मिळतं, आर्द्रता मिळते. लिंबामुळे ओठांवरील काळेपणा कमी करून त्यांचा नैसर्गिक गुलाबी रंग परत आणण्यास मदत होते. एक चमचा मधात लिंबाच्या रसाचे काही थेंब मिसळा, हे मिश्रण ओठांवर लावा आणि दहा मिनिटं तसंच राहू द्या. याच्या नियमित वापरामुळे ओठ मऊ आणि चमकदार दिसतात.

साजूक तूप किंवा लोणी – झोपण्यापूर्वी ओठांवर थोडं साजूक तूप किंवा लोणी लावणं हा एक जुना पण अत्यंत प्रभावी उपाय आहे. यामुळे ओठांमधील ओलावा टिकून राहण्यास मदत होते.

खोबरेल तेल – झोपण्यापूर्वी ओठांवर खोबरेल तेलानं हलक्या हातानं मालिश करा. त्यातील ‘व्हिटॅमिन ई’ मुळे ओठांची झीज भरून येते आणि फाटलेले ओठ हळूहळू बरे होतात.

साखर आणि ऑलिव्ह ऑइलचा स्क्रब – ओठांवरील मृत त्वचा काढून टाकण्यासाठी, अर्धा चमचा ऑलिव्ह ऑइलमधे एक चमचा साखर मिसळा आणि एका मिनिटासाठी हलक्या हातानं ओठांवर स्क्रब करा. यामुळे ओठांवरील मृत त्वचा निघून जाते आणि ओठ मऊ आणि आर्द्र राहतात.

बीट – बीटाच्या रसामुळे ओठांना त्वरित नैसर्गिक गुलाबी छटा मिळते. दररोज रात्री झोपण्यापूर्वी बीटाचा थोडा रस ओठांवर लावा आणि तो सुकू द्या; यामुळे ओठांना गुलाबी रंग प्राप्त होतो.

कोरफड – कोरफडीच्या गरामुळे ओठांचा कोरडेपणा आणि जळजळ कमी होते. ताजा गर ओठांवर लावा, पंधरा मिनिटं तसंच राहू द्या आणि नंतर पाण्यानं धुवा.

गुलाबाच्या पाकळ्या आणि दूध – गुलाबाच्या पाकळ्या काही तास दुधात भिजत ठेवा, त्यानंतर त्यांची पेस्ट तयार करा आणि ही पेस्ट रोज ओठांवर लावा. हे ओठांसाठी नैसर्गिक ‘लिप टिंट’ म्हणजे रंग देणारं साधन म्हणून काम करतं आणि ओठांचा गुलाबी रंग नैसर्गिकरित्या खुलून येतो.

हायड्रेशन आणि आहार – ओठांमधील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी शरीरातील पाण्याचं प्रमाण योग्य राखणं अत्यंत आवश्यक आहे. दिवसभरात भरपूर पाणी प्या आणि आहारात जीवनसत्त्वं ‘ई’ आणि ‘सी’ तसंच बीटा-कॅरोटीनयुक्त फळं आणि भाज्यांचा समावेश करा.

सूर्यापासून संरक्षण – चेहऱ्यावर सनस्क्रीन लावलं जातं पण ओठांकडे दुर्लक्ष होतं. सूर्याच्या हानिकारक किरणांपासून संरक्षण करण्यासाठी योग्य ‘एसपीएफ’ असलेला लिप बाम वापरा.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *