Harmanpreet Kaur and Richa Ghosh Team IndiaImage Credit source: bcci women X Account
आयसीसी वुमन्स टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील 10 व्या सामन्यात 17 जून रोजी टीम इंडिया विरुद्ध नेदरलँड्स आमनेसामने होते. भारतीय संघाने या सामन्यात नेदरलँड्सवर एकतर्फी विदय मिळवला. भारताने या सामन्यात नेदरलँड्सचा 95 धावांनी मात केली. भारताने यासह या स्पर्धेतील सलग आणि दुसरा विजय मिळवला. भारताने नेदरलँड्सआधी पाकिस्तानला पराभूत करत स्पर्धेत विजयी सलामी दिली. भारताने सलग 2 विजयानंतर 4 गुण कमावले आहेत. भारताला नेदरलँड्स विरूद्धच्या विजयानंतर मोठा फायदा झाला आहे. भारताने ऑस्ट्रेलियाने पछाडत पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी झेप घेतली आहे.