कुमकुम भाग्य फेम अभिनेत्री संचिता उगलेने राहत्या घरी केली आत्महत्या, 19 तासांपूर्वी शेअर केलेला व्हिडीओ – Marathi News | Marathi actress Sanchita Ugale life end at her residence at the age of 30


मराठी आणि हिंदी टीव्ही इंडस्ट्रीमधील सर्वाच चर्चेत असणारी अभिनेत्री संचिता उगालेने वयाच्या अवघ्या 30व्या वर्षी आत्महत्या केली आहे. तिने मुंबईजवळील नालासोपारा येथे तिच्या राहत्या घरी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे मनोरंजन विश्वात तसेच तिच्या चाहत्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संचिता उगाले ही नालासोपारा पूर्व येथील आचोळे गाव परिसरात आपल्या कुटुंबासोबत राहत होती. तिच्या कुटुंबात आई-वडील आणि 15 वर्षीय धाकटी बहीण आहे. रविवारी सायंकाळी सुमारे 7 ते 7.30 वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे. त्यावेळी घरात ती एकटीच असल्याची प्राथमिक माहिती आहे. नंतर कुटुंबीय घरी परतल्यानंतर ही बाब उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पुढील तपास सुरू केला.

पोलिसांकडून तपास सुरू

पोलिसांनी घटनेची नोंद करून मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. सध्या पोलिस विविध अंगांनी तपास करत आहेत. घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून अधिकृत तपास अहवालानंतरच संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे.

अधिकाऱ्यांनी नागरिकांना आणि माध्यमांना अपुष्ट माहितीवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. तपास पूर्ण होईपर्यंत कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचणे योग्य नसल्याचेही पोलिसांनी नमूद केले आहे.

मनोरंजन क्षेत्रात शोककळा

संचिता उगालेने आपल्या अभिनयाच्या जोरावर अल्पावधीतच प्रेक्षकांची मने जिंकली होती. तिच्या अकाली निधनाच्या बातमीने सहकलाकार, मित्रपरिवार आणि चाहते स्तब्ध झाले आहेत. सोशल मीडियावर अनेकांनी तिला श्रद्धांजली अर्पण करत दुःख व्यक्त केले आहे. तिच्या निधनामुळे मनोरंजन क्षेत्राने एक गुणी कलाकार गमावल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

19 तासांपूर्वी शेअर केलेला व्हिडीओ

संचिताने आत्महत्या करण्यापूर्वी तिच्या इन्स्टाग्रामवर अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला होता. ज्यामध्ये तिने डफलीवाले डफली बजा या गाण्यावर एक रील्स तयार करून तो इनस्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्याला तिने Mai naachu tu nachaaaaa असं कॅप्शन दिलं आहे. पण अचानक नेमकं काय घडलं ज्यामुळे तिने हे टोकाचं पाऊल उचललं हे पाहणे गरजेचे आहे.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *