Ketan Agarwal Case : ‘केतन वाचलाच नसता…’ सिया अन् चेतनने निवडलेली जागा हादरवणारी; 350 फूट खोल दरीत फेकलेला पुतळाही झाला छिन्नविछिन्न; लोहगडावरील थरकाप उडवणारा व्हिडीओ समोर


पुणे: बहुचर्चित केतन अग्रवाल हत्याकांडात लोणावळा ग्रामीण पोलिसांनी तपासाचा वेग प्रचंड वाढवला आहे. आज सकाळी पोलीस या प्रकरणातील दुसरा मुख्य आरोपी चेतन चौधरी याला घेऊन थेट लोहगड किल्ल्यावर (Ketan Agarwal Case) दाखल झाले. केतनला किल्ल्यावरून दरीत कसं ढकलण्यात आलं, याचं ‘क्राइम सीन रिक्रिएशन’ (गुन्ह्याचे प्रात्यक्षिक) करण्यासाठी पोलिसांनी ही मोहीम हाती घेतली आहे. लोहगड परिसरात(Ketan Agarwal Case) सध्या दाट धुकं आणि मुसळधार पाऊस सुरू असतानाही, पोलिसांनी हे थरारक प्रात्यक्षिक सुरू ठेवले आहे. चेतनच्या उपस्थितीत, केतनच्या वजनाइतकाच आणि शरीरयष्टीचा एक पुतळा लोहगड किल्ल्यावरून खाली फेकण्यात आला. पुतळा खाली पडल्यानंतर त्याची काय अवस्था झाली होती, याचे फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत.(Ketan Agarwal Case)

Ketan Agarwal Case : केतनच्या जिवंत राहण्याची शक्यता होती पूर्णपणे शून्य

घटनास्थळावरून समोर आलेली दृश्ये थरकाप उडवणारी आहेत. आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनी केतनचा काटा काढण्यासाठी लोहगडावरील जी जागा निवडली होती, ती अत्यंत भयंकर आणि धोकादायक आहे. तिथून खाली पाहिले तरी अंगावर काटा येतो. पोलिसांनी केलेल्या तपासानुसार, या जागेवरून खाली ढकलल्यानंतर केतन जिवंत वाचण्याची शक्यता पूर्णपणे शून्य होती. कोणत्याही परिस्थितीत केतन वाचणारच नाही, अशाच अचूक आणि थरारक स्लोप असलेल्या जागेची निवड या दोघांनी केली होती.

Ketan Agarwal Case : डॅश लागताच पुतळ्याची अवस्था झाली छिन्नविछिन्न!

यापूर्वी पोलिसांनी मुख्य आरोपी सिया गोयल हिला घटनास्थळी आणून गुन्ह्याचे प्रात्यक्षिक घेतले होते. त्यावेळी केतनच्या उंचीचा आणि वजनाचा एक डमी पुतळा (Doll) वापरण्यात आला होता. पोलिसांनी सियाला त्या पुतळ्याला धक्का देण्यास सांगितले. सियाने धक्का देताच तो पुतळा ३५० ते ४०० फूट खोल दरीत जाऊन कोसळला.

हा पुतळा खाली पडताना उभ्या खडकांवर आदळत गेल्यामुळे त्याचे तुकडे-तुकडे झाले आणि तो पूर्णपणे छिन्नविछिन्न अवस्थेत खाली सापडला. जर एका कृत्रिम पुतळ्याची ही अवस्था झाली असेल, तर प्रत्यक्ष केतन दरीत कोसळताना काय परिस्थिती झाली असेल? याची कल्पना करणेही अशक्य आहे. उभा खडक असल्यामुळे केतन खाली कोसळताना त्याच्या डोक्याला आणि शरीराला गंभीर दुखापत झाली असावी, असा अंदाज फॉरेन्सिक टीमने व्यक्त केला आहे.

Ketan Agarwal Case : शेवटचा धक्का नक्की कोणी दिला? चेतनच्या चौकशीकडे लक्ष

आज सकाळपासून चेतन चौधरीच्या उपस्थितीत पुन्हा एकदा लोहगडावर हे प्रात्यक्षिक केले जात आहे. केतनच्या वजनाचा पुतळा चेतनच्या समोर दरीत फेकून पोलिसांकडून वेळेचे आणि अंतराचे गणित मांडले जात आहे. सिया आणि चेतन या दोघांच्या स्वतंत्र ‘सीन रिक्रिएशन’नंतर आता एक अत्यंत महत्त्वाचा खुलासा होणार आहे, तो म्हणजे, “केतनला दरीत शेवटचा धक्का नेमका कोणी दिला होता?”, त्याचबरोबर या घटनेचा फॉरेन्सिक टीम आणि पोलीस अधिकारी पुरावे गोळा करत आहेत. आजच्या या कारवाईनंतर चेतन पोलीस चौकशीत नेमका काय मोठा खुलासा करतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Ketan Agarwal Case : केतनच्या हत्येनंतर लोहगडावर पर्यटकांचा ओढा, 25 ते 30 टक्क्यांनी संख्या वाढली

केतन अगरवालची हत्या कुठं झाली? त्याची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरीने चेतनला दरीत कसं ढकललं? हे पाहण्याच्या उत्सुकतेपोटी लोहगडावर पर्यटक आकर्षित होत आहेत. केवळ महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून नव्हे तर अगदी दिल्लीतून ही काही पर्यटक केतनच्या हत्येचा स्पॉट पहायला पोहचलेत. एरव्ही सुट्टी दिवशी हजारभर पर्यटक यायचे आता, ही संख्या पंधराशे वर पोहचली आहे. तर सोमवार ते शुक्रवारच्या दरम्यान इथं चारशे पर्यटक यायचे आता सहाशे पर्यटक लोहगडावर पोहचत आहेत. 

हेदेखील वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *