Raj Thackeray on Maharashtra Politics: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या जे काही सुरु आहे ते घाणेरडं आणि भयानक आहे. सध्याच्या परिस्थितीत प्रश्न विकत घेणाऱ्यांबाबत नाही तर विकल्या जाणाऱ्यांबाबत आहेत. हे देहविक्रीला तयार असतील तर गिऱ्हाईकं तयार आहेतच, अशी जळजळीत टीका मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केली. ठाकरे गटातील फुटीर खासदार- आमदारांबाबत बोलताना त्यांनी हे मत मांडले. ते बुधवारी ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यातील आणि देशातील राजकीय परिस्थितीबाबत बोलताना भाजपला (BJP) लक्ष्य केले. भविष्यात या सगळ्याचे परिणाम भाजपलाही भोगावे लागतील, असा इशाराही राज ठाकरे यांनी दिला. (Maharashtra Politics)
महाराष्ट्रात सध्या जे काही घाणेरडं राजकारण सुरु आहे, त्याबाबत लोकांमध्ये संताप आहे. उद्या सत्ता गेल्यावर भाजपलाही या गोष्टींचा त्रास होईल. आपण काय करतोय, कुठपर्यंत जायचं, याला मर्यादा आहेत की नाही? ज्या ज्या वेळेला जगात एखाद्या सत्ताधाऱ्याने विरोधकांना संपावले आहे, त्यावेळी त्यांच्यातूनच दुश्मन तयार झाले आहेत. त्यांनीच त्यांना संपवले आहे. ही प्रक्रिया भाजपमध्ये सुरु झाली आहे. तुम्ही बाहेरचे विरोधी पक्ष संपवणे हे सोडून द्या, पण तुमच्यात विरोधक निर्माण झालेत, तुम्हाला त्रास होईल तो तुम्हीही बघून घ्याल. हा जगाचा इतिहास आहे. आणीबाणीच्या काळातही तेच झालं होतं, असे राज ठाकरे यांनी म्हटले.
पत्त्यांचा बंगला असतो ना, तसा भाजप हा उलटा बंगला आहे. सगळ्यात खालचा पत्ता नरेंद्र मोदींचा आहे, तो एकदा सटकला तर सगळं कोसळून पडेल. तुम्ही मोदी समर्थकांना भक्त म्हणा काहीही म्हणा. पण भाजप आज मोदींवर टिकून आहे, बाकीच्यांवर नाही. आता जे राजकारण खेळताय, ते तुमच्याशी अंगाशी येणार आहे, असेही राज ठाकरे यांनी म्हटले.
Operation Tutari Special Report : राज्यात ऑपरेशन तुतारी? शरद पवार गटात दोन मतप्रवाह