Skin Care : त्वचा उजळण्यासाठी पारंपरिक उपाय, त्वचेसाठी दह्याचा वापर कसा करायचा समजून घेऊया | लाइफस्टाईल बातम्या


Last Updated:

त्वचेतील अशुद्धता खोलवर स्वच्छ करण्यासाठी, दह्यामधील लॅक्टिक ॲसिड उपयोगी आहे, तसंच त्यात तीन खास घटक मिसळल्यानं त्वचा फ्रेश दिसायला मदत होते. दह्यासोबत कोणते घटक वापरता येतील आणि त्यांचा वापर कसा करायचा पाहूया.

News18
News18

मुंबई : चेहऱ्यावरचे डाग कमी करणं, टॅनिंग घालवणं यासाठी दही हा पारंपरिक उपाय. दह्याचा वापर चेहऱ्यासाठी का आणि कसा करायचा समजून घेऊया.

त्वचेतील अशुद्धता खोलवर स्वच्छ करण्यासाठी, दह्यामधील लॅक्टिक ॲसिड उपयोगी आहे, तसंच त्यात तीन खास घटक मिसळल्यानं त्वचा फ्रेश दिसायला मदत होते. दह्यासोबत कोणते घटक वापरता येतील आणि त्यांचा वापर कसा करायचा पाहूया.

दह्यासोबत मिसळण्यासारख्या तीन गोष्टी – दही एक उत्तम क्लीन्झर आहे. त्यात आणखी काही घटक घालून वापरल्यानं अधिक फायदा मिळतो.

डाळीचं पीठ : डाळीच्या पीठामुळे त्वचेतील अतिरिक्त तेल आणि मृत त्वचेच्या पेशी काढून टाकण्यासाठी मदत होते.

हळद: सौंदर्य वाढवण्यासाठी शतकानुशतकं हळदीचा वापर केला जात आहे. तिच्या गुणधर्मांमुळे डाग हलके होतात आणि त्वचेला सोनेरी चमक येते.

मध: मधामुळे नैसर्गिकरित्या त्वचेला आर्द्रता मिळते. कोरड्या आणि निस्तेज त्वचेला आतून हायड्रेट केल्यामुळे त्वचा मऊ आणि चमकदार बनते.

फेस पॅक कसा बनवायचा पाहूया – हा फेस पॅक बनवायला आणि त्वचेवर लावायला खूप सोपा आहे. एका स्वच्छ वाटीत दोन मोठे चमचे ताजं, घट्ट दही घ्या. ते फार आंबट नसावं याची काळजी घ्या. या दह्यात एक छोटा चमचा डाळीचं पीठ, चिमूटभर हळद आणि अर्धा छोटा चमचा मध घाला.

एक गुळगुळीत, घट्ट पेस्ट तयार होईपर्यंत हे सर्व साहित्य चमच्यानं चांगलं मिसळा. चेहरा साध्या पाण्यानं धुवा आणि हलक्या हातानं पुसून घ्या. डोळ्यांच्या आजूबाजूचा भाग सोडून, ​​ही पेस्ट चेहऱ्यावर आणि मानेवर समान रीतीनं लावा. पंधरा ते वीस मिनिटं पॅक चेहऱ्यावर राहू द्या. मिश्रण थोडं वाळल्यावर, बोटं ओली करून दोन मिनिटं चेहऱ्यावर हळुवारपणे मसाज करा.

थंड किंवा साध्या पाण्यानं चेहरा पूर्णपणे स्वच्छ धुवा आणि मऊ टॉवेलनं हलकं पुसून घ्या. चेहरा धुतल्यानंतर तुम्हाला त्वचेत ताजेपणा आणि चमक जाणवेल. हा सोपा घरगुती उपाय आठवड्यातून किमान दोनदा करून पहा. यामुळे त्वचेचा पोत सुधारेल.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *