IPL 2026 Playoffs Schedule: 4 संघ, 4 सामने…पहिले आरसीबी आणि गुजरात, मग राजस्थान आणि हैदराबाद भिडणार, प्लेऑफचं संपूर्ण वेळापत्रक


IPL 2026 Playoffs Schedule: आयपीएल 2026 च्या हंगामातील साखळी फेरीचे सामने संपले असून आता प्लेऑफच्या लढती (IPL 2026 Playoffs Schedule) होणार आहे. आयपीएलच्या प्लेऑफसाठी 10 संघापैकी पात्र ठरणाऱ्या चार संघांची नावेही निश्चित झाली आहेत. गतविजेते रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, गुजरात टायटन्स, तसेच राजस्थान रॉयल्स, सनरायझर्स हैदराबाद या संघांनी प्लेऑफमधील आपले स्थान पक्के केले आहे. आयपीएल 2026 चा अंतिम सामना 31 मे रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.

IPL 2026 प्लेऑफचे संपूर्ण वेळापत्रक- (IPL 2026 Playoffs Schedule)

प्लेऑफचे सामने गुणतालिकेतील (IPL Points Table) स्थानांवर आधारित निश्चित केले जातात. गुणतालिकेत पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या संघांमध्ये पहिला ‘क्वालिफायर’ सामना खेळवला जातो. याचा अर्थ असा की, 26 मे रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात ‘क्वालिफायर 1’ चा सामना रंगेल. दरम्यान, गुणतालिकेत तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर असलेल्या संघांमध्ये ‘एलिमिनेटर’ सामना खेळवला जातो. सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील एलिमिनेटर सामना 27 मे रोजी खेळला जाईल. यानंतर, क्वालिफायर 1 मध्ये पराभूत झालेला संघ आणि एलिमिनेटरमध्ये विजयी झालेला संघ यांच्यात क्वालिफायर 2 मध्ये भिडतील. 

आरसीबी आणि गुजरातकडे अंतिम फेरीत थेट प्रवेशाची संधी- (IPL 2026 Playoffs Schedule)

जो संघ पहिला क्वालिफायर सामना जिंकतो, तो थेट अंतिम फेरीत प्रवेश करतो. याचा अर्थ असा की, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स या दोन्ही संघांकडे अंतिम फेरीत थेट पोहोचण्याची संधी असेल. समजा आरसीबीने क्वालिफायर 1 जिंकला आणि अंतिम फेरीत प्रवेश केला; तरीही गुजरात टायटन्स स्पर्धेतून बाहेर पडणार नाहीत, कारण त्यांना अंतिम फेरीत पोहोचण्याची दुसरी संधी मिळेल. त्यानंतर गुजरातचा संघ क्वालिफायर 2 मध्ये खेळेल. याउलट, जो संघ एलिमिनेटर सामना हरतो, तो स्पर्धेतून बाद होतो; तर विजयी संघ पुढे क्वालिफायर 2 मध्ये खेळण्यासाठी जातो. शेवटी, क्वालिफायर 2 चा विजेता संघ अंतिम महामुकाबल्यात क्वालिफायर 1 च्या विजेत्या संघाचा सामना करतो.

IPL 2026 प्लेऑफचे संपूर्ण वेळापत्रक- (IPL 2026 Playoffs Schedule)

26 मे – RCB विरुद्ध GT – क्वालिफायर 1 (धर्मशाला)
27 मे – SRH विरुद्ध RR – एलिमिनेटर (न्यू चंदीगड)
29 मे – क्वालिफायर 2 – न्यू चंदीगड
31 मे – अंतिम सामना – अहमदाबाद

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, Video:

संबंधित बातमी:

PBKS Knocked OUT IPL 2026 : श्रेया मोठा गेम झाला यार, IPL इतिहासातील सर्वात मोठा ट्विस्ट! जो संघ 21 दिवस आधीच क्वालिफाय होणार होता, तो थेट स्पर्धेतूनच आऊट

आणखी वाचा





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *