RCB vs GT IPL 2026 Final : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स (RCB vs GT Final) या दोन बलाढ्य संघांमध्ये आयपीएल 2026 चा महाअंतिम सामना खेळवला जाणार असून क्रिकेट चाहत्यांची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. हा हायव्होल्टेज सामना अहमदाबाद येथील जगातील सर्वात मोठ्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) रंगणार आहे. बंगळुरू संघाने संपूर्ण हंगामात आपले वर्चस्व राखले आहे, तर दुसरीकडे गुजरातने स्पर्धेच्या उत्तरार्धात जबरदस्त पुनरागमन करत फायनलपर्यंत धडक मारली आहे.
विशेष म्हणजे, बंगळुरू आणि गुजरात या दोन्ही संघांनी यापूर्वी प्रत्येकी एक-एक वेळा आयपीएलची ट्रॉफी जिंकली आहे. त्यामुळे 31 मे 2026 रोजी होणाऱ्या या अंतिम सामन्यात जो संघ जिंकेल, तो दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावून नवा इतिहास रचणार आहे. मात्र, नरेंद्र मोदी स्टेडियमची खेळपट्टी काय सांगते? येथील आकडेवारीनुसार कोणत्या संघाचे कॉम्बिनेशन जास्त मजबूत आहे आणि कोण बाजी मारू शकतं? यावर टाकलेली हा एक विशेष नजर.
Ahmedabad Pitch Report : खेळपट्टी कोणाला साथ देणार?
अहमदाबादचे नरेंद्र मोदी स्टेडियम हे गुजरात टायटन्सचे (Gujarat Titans) हक्काचे होमग्राउंड आहे. त्यामुळे घरच्या मैदानाचा आणि प्रेक्षकांच्या पाठिंब्याचा मोठा फायदा (Home Advantage) साहजिकच गुजरातच्या संघाला मिळणार आहे. आयपीएल 2026 च्या चालू हंगामात गुजरातने या मैदानावर 7 सामने खेळले असून त्यापैकी 5 सामन्यांत शानदार विजय मिळवला आहे. दुसरीकडे, आरसीबीचा (RCB) या मैदानावरील रेकॉर्ड संमिश्र राहिला आहे. बंगळुरूने येथे खेळलेल्या 8 सामन्यांपैकी 4 सामन्यांत विजय मिळवला, तर 4 सामन्यांत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.
RCB vs GT Head to Head : हेड-टू-हेड आकडेवारीमध्ये RCB पुढे
जरी गुजरातचे हे होमग्राउंड असले, तरी अहमदाबादच्या मैदानावर बेंगळुरू आणि गुजरात यांच्यातील हेड-टू-हेड (Head to Head) आकडेवारी पाहिली तर आरसीबीचे पारडे जड दिसते. म्हणजेच बंगळुरूच्या संघाने अनेकदा गुजरातला त्यांच्याच घरात घुसून धूळ चारली आहे. अहमदाबादमध्ये आतापर्यंत आरसीबीने 5 वेळा गुजरात टायटन्सचा पराभव केला आहे, तर 4 सामन्यांत गुजरातला विजय मिळाला आहे. त्यामुळे आकडेवारीनुसार फायनलमध्ये बंगळुरूचा आत्मविश्वास नक्कीच उंचावलेला असेल.
Gujarat Titans Weakness : गुजरातची ताकद अन् कमजोरी
संपूर्ण हंगामात एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली आहे ती म्हणजे गुजरातची फलंदाजी प्रामुख्याने कर्णधार शुभमन गिल आणि साई सुदर्शन यांच्यावरच अवलंबून आहे. क्वालीफ़ायर 1 च्या सामन्यात हे दोन्ही फलंदाज अपयशी ठरले आणि त्याचा थेट परिणाम असा झाला की आरसीबीने त्यांचा पराभव करून थेट फायनलमध्ये प्रवेश केला.
गिल आणि सुदर्शनचा अपवाद वगळता गुजरातचे इतर फलंदाज सध्या चांगल्या फॉर्मात नाहीत. दोन्ही संघांचे गोलंदाजी आक्रमण मात्र जवळपास बरोबरीचे आहे.
Bowlers Leadership Role : आरसीबीच्या गोलंदाजांवर असेल मोठी जबाबदारी
गुजरातच्या फलंदाजीची हीच कमकुवत कडी ओळखून आरसीबी रणनीती आखत आहे. जर भुवनेश्वर कुमार आणि जोश हेझलवूड यांच्या नेतृत्वाखालील आरसीबीच्या गोलंदाजी आक्रमणाने शुभमन गिल आणि साई सुदर्शन यांना पॉवरप्लेमध्येच स्वस्तात बाद केले, तर बंगळुरूचा अर्धा रस्ता तिथेच सोपा होईल. शुभमन गिल आणि साई सुदर्शन यांनी या हंगामात मिळून तब्बल 1,432 धावा कुटल्या आहेत. त्यामुळे महाअंतिम सामन्यात या जोडीची विकेट मिळवणे हेच बंगळुरूच्या विजेतेपदाचे खरे सूत्र ठरणार आहे.
ही बातमी वाचा:
आणखी वाचा