IND vs ENG 1st ODI : बुमराह-कोहलीचे पुनरागमन, गंभीरच्या विश्वासू खेळाडूलाही संधी?, इंग्लंडविरुद्ध पहिल्या वनडेत अशी असेल टीम इंडियाची Playing XI


IND vs ENG 1st ODI Playing XI : इंग्लंडविरुद्धची पाच सामन्यांची टी-20 मालिका 4-0 ने गमावल्यानंतर आता टीम इंडियासमोर वनडे मालिकेत दमदार पुनरागमन करण्याचे मोठे आव्हान आहे. 14 जुलै रोजी बर्मिंगहॅम येथे भारत आणि इंग्लंड यांच्यात पहिला वनडे सामना खेळवला जाणार असून, या सामन्यात भारताच्या संघात अनेक मोठे बदल पाहायला मिळू शकतात. विशेष म्हणजे, अनुभवी फलंदाज विराट कोहली आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हे दीर्घ विश्रांतीनंतर भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी सज्ज आहेत. त्यामुळे भारताच्या प्लेइंग इलेव्हनकडे सर्व क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

रोहित-शुभमनची जोडी सलामीला तर… 

भारताकडून डावाची सुरुवात कर्णधार शुभमन गिल आणि रोहित शर्मा ही अनुभवी जोडी करेल, अशी दाट शक्यता आहे. पॉवरप्लेचा पुरेपूर फायदा घेत संघाला वेगवान सुरुवात करून देण्याची जबाबदारी या दोघांवर असेल. अफगाणिस्तानविरुद्ध नुकत्याच झालेल्या वनडे मालिकेत या दोघांनी शानदार फलंदाजी केली होती. शुभमन गिलने दोन डावांत तब्बल 238 धावा केल्या होत्या, तर रोहित शर्माने 143 धावांचे योगदान दिले होते. त्यामुळे इंग्लंडविरुद्धही ही जोडी मोठी खेळी करेल, अशी अपेक्षा आहे.

विराट कोहलीच्या पुनरागमनाकडे सर्वांचे लक्ष

दुखापतीमुळे अफगाणिस्तानविरुद्धची वनडे मालिका गमावलेल्या विराट कोहलीचे आता भारतीय संघात पुनरागमन होणार आहे. जवळपास सहा महिन्यांनंतर तो पुन्हा एकदा टीम इंडियाच्या निळ्या जर्सीत मैदानात उतरणार आहे. आयपीएल 2026 मध्ये विराटने जबरदस्त फलंदाजी करत अनेक सामन्यांत संघाला विजय मिळवून दिला होता. त्यामुळे इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेतही त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. तो तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करत डाव सावरण्याची भूमिका पार पाडू शकतो.

श्रेयस अय्यर आणि राहुलवरही मोठी जबाबदारी

चौथ्या क्रमांकावर उपकर्णधार श्रेयस अय्यरला संधी मिळण्याची शक्यता आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारताला इंग्लंडविरुद्ध टी-20 मालिकेत 4-0 असा पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे वनडेत फलंदाज म्हणून प्रभावी कामगिरी करत संघाला विजय मिळवून देण्याचा त्याचा प्रयत्न असेल. पाचव्या क्रमांकावर अनुभवी केएल राहुल खेळू शकतो. अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेत त्याने 139 धावा करत शानदार फॉर्म दाखवला होता. त्याचबरोबर विकेटकीपिंगची जबाबदारीही राहुलच्या खांद्यावर असण्याची शक्यता आहे.

गोलंदाजी विभाग अधिक मजबूत

पहिल्या वनडेत भारताचा गोलंदाजी विभागही भक्कम दिसत आहे. जसप्रीत बुमराहच्या पुनरागमनामुळे वेगवान गोलंदाजीला मोठी धार मिळणार आहे. त्याला अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा आणि गुरनूर ब्रार यांची साथ मिळू शकते. इंग्लंडमधील स्विंगला अनुकूल वातावरणाचा फायदा घेत ही चौकडी इंग्लंडच्या फलंदाजांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करेल. तर फिरकीची जबाबदारी अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांच्यावर असेल. टी-20 मालिकेत भारतीय फिरकीपटू अपेक्षित प्रभाव पाडू शकले नव्हते. त्यामुळे वनडे मालिकेत ते दमदार पुनरागमन करण्यासाठी उत्सुक असतील.

भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन (पहिला वनडे)

शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टिरक्षक), अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा, गुरनूर ब्रार

भारताचा एकदिवसीय संघ : शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली*, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), केएल राहुल (डब्ल्यूके), इशान किशन (WK), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, नितीश कुमार रेड्डी, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, गुरनूर ब्रार.

हे ही वाचा –

Team India Gautam Gambhir : विश्वविजेत्या टीम इंडियाची पार ‘लंका’ लागली! …आता गौतम गंभीरवर कारवाईचा हातोडा, BCCI काय निर्णय घेणार?



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *