Cricketer Sandeep Patil on Maharashtrachi Hasyajatra: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रम प्रेक्षकांना खळखळून हसवतो. महाराष्ट्रभरात या शोचे अनेक चाहते आहेत. या शोमधील प्रत्येक कलाकाराचा वेगळा fan बेस आहे. अनेकानी या शोच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवलं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा कार्यक्रम प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करत असून,इथे येणारा प्रत्येक पाहुणा कलाकार हास्यजत्रेतील विनोदवीरांचं कौतुक करताना दिसतो. अलीकडेच हास्यजत्रेत माजी क्रिकेटपटू संदीप पाटील आणि त्यांचा लेक अभिनेता चिराग पाटील आणि नात रियाना पाटील विशेष पाहुणे म्हणून उपस्थित होते. सोनी मराठीने हास्यजत्रेतील त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये क्रिकेटपटू संदीप पाटील यांनी ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाचं भरभरून कौतुक केलं.
क्रिकेटपटू संदीप पाटील यांनी केलं हास्यजत्रेचं कौतुक
‘महराष्ट्राची हस्यजत्रा’ या कार्यक्रमात माजी क्रिकेटपटू संदीप पाटील सहभागी झाले होते. त्यांनी या शोचे कौतुक केले आहे. ते म्हणाले,” मी फक्त ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च बघतो.तुम्हाला कदाचित विश्वास बसणार नाही.पण एकीकडे मॅच सुरू असेल आणि दुसरीकडे महाराष्ट्राची हास्य जत्रा सुरू असेल, तर माझं सगळं लक्ष मॅच कडे नाही तर हास्य जत्रेच्या स्किटकडे असतं. सुनील गावस्कर, बलविंदर संधू, आम्ही सगळेच जण आणि ज्यांना मराठी येत नाही, ज्यांना कळत नाही, ते सुद्धा महाराष्ट्राची हास्यजत्रा न चुकता बघतात. समीर दादा, ओंकार भोजने, प्रसाद खांडेकर एका पेक्षा एक प्रभाकर मोरे म्हणा हे आणि इतर सगळेच कलाकार मला फार आवडतात. ‘ असं ते म्हणाले.
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातील समीर चौगुलेच्या प्रहसनाचे कौतुक सांगताना क्रिकेटर संदीप पाटील म्हणाले ‘ समीर दादा चिलखत घालतात, धडपडत जातात. खोटं चिलखत त्याने घातलेला असतं. सगळी खोटी हत्यारं लावलेली असतात. पण नंतर त्याला असा काही हुरूप चढतो की, तो मला आता खरे शस्त्र पाहिजे असं म्हणतो. चिलखत जिरेटोप वगैरे.. आणि ते सगळं खरोखर त्याला जेव्हा बसवलं जातं त्या वेळेला त्याची जी अवस्था होते ..अ वर्णनीय अभिनय म्हणावा लागेल. प्रसाद दादाचही प्रत्येक किट..एक स्किट कसं म्हणणार. हजारो स्किट झाली आहेत. ही सगळीच स्कीट पाहण्याचा मी प्रयत्न केलाय. 1983 च्या संघात आमचा 14 जणांमध्ये नऊ अष्टपैलू होते. पण महाराष्ट्राच्या हास्य जत्रेत सर्वच अष्टपैलू आहेत. मला खरंच या सगळ्यांची कमाल वाटते . जितकं अभिनंदन करावं तेवढं कमी. मी तर हेही म्हणेन की, महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम महाराष्ट्रापुरता मर्यादित न राहता भारतभर ही हास्यजत्रा रंगली तर फार मजा येईल.’ असं क्रिकेटर संदीप पाटील म्हणाले.