‘धुरंधर 2’फेम गायिकेनं भर कॉन्सर्टमध्ये केली साखरपुड्याची घोषणा; स्टेजवर होणाऱ्या नवऱ्याला घेऊन आली अन् .. 


Dhurandhar fame Jasmine Sandlas engagement announcment:  ‘धुरंधर’आणि धुरंधर 2 चित्रपटातील गाणी गाणारी गायिका जॅस्मिन सँडलस हिने दिल्लीतील तिच्या कॉन्सर्टदरम्यान चाहत्यांना मोठा सरप्राईज दिलं. स्टेजवरच तिने आपल्या होणाऱ्या नवऱ्याची सर्वांसमोर ओळख करून दिली आणि आपण साखरपुडा केल्याची घोषणा केली. दिल्लीमध्ये झालेल्या ‘द ड्रीम गर्ल इंडिया टूर’च्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात जॅस्मिनने साखरपुड्याची आनंदाची बातमी जाहीर केली. ती अचानक स्टेजवर आपल्या होणाऱ्या नवऱ्याला शेखर चौधरी यांच्यासोबत आली. आनंदाच्या भरात ती त्याच्या मिठीत धावत गेली. हा क्षण पाहून उपस्थित चाहत्यांनी टाळ्यांच्या आणि जल्लोषाच्या गजरात त्यांचे स्वागत केले.

स्टेजवर दाखवली साखरपुड्याची अंगठी

कार्यक्रमातील सर्वात संस्मरणीय क्षण तेव्हा घडला, जेव्हा जॅस्मिनने शेखर चौधरी यांना स्टेजवर बोलावले आणि आपल्या हातातील साखरपुड्याची अंगठी चाहत्यांना दाखवली. त्यानंतर या जोडप्याने उपस्थितांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला, एकमेकांसोबत रोमँटिक क्षण अनुभवला आणि जॅस्मिनच्या लोकप्रिय ‘लावां’ या गाण्यावर एकत्र नृत्यही केले. त्यामुळे हा क्षण चाहत्यांसाठी अधिकच खास ठरला.

दिल्लीतून इंडिया टूरची दमदार सुरुवात

देशाची राजधानी दिल्ली येथे झालेल्या या भव्य कॉन्सर्टमधून जॅस्मिनच्या ‘द ड्रीम गर्ल इंडिया टूर’ला सुरुवात झाली. या कार्यक्रमात तिने एकापाठोपाठ एक दमदार सादरीकरण करत प्रेक्षकांना अक्षरशः थिरकायला भाग पाडले. तिने ‘लावां’, ‘पंजेबा’ आणि ‘सिप सिप’ यांसारखी लोकप्रिय पंजाबी गाणी सादर केली. त्यानंतर ‘शरारत’, ‘जाइए सजना’ आणि टायटल ट्रॅकसह तिने वातावरण आणखी रंगतदार केले. तसेच ‘तरस’, ‘इलीगल वेपन’ आणि ‘यार ना मिले’ या सुपरहिट गाण्यांनीही प्रेक्षकांची मनं जिंकली.

 

चाहत्यांशी साधला संवाद

संगीतासोबतच जॅस्मिनने चाहत्यांशी मनमोकळा संवाद साधला.’द ड्रीम गर्ल इंडिया टूर’ संपूर्ण देशभर घेऊन जाण्याबाबतचा उत्साह तिने व्यक्त केला. कार्यक्रमादरम्यान चाहत्यांनी तिच्यासाठी आणलेल्या भेटवस्तूही तिने आवर्जून पाहिल्या आणि त्यांचे कौतुक केले. उद्घाटनाच्या कॉन्सर्टसाठी जॅस्मिनने जड दागिन्यांसह सोनेरी रंगाचा आकर्षक लेहेंगा परिधान केला होता. तिचा हा ग्लॅमरस लूक आणि तिची दमदार स्टेज एनर्जी यामुळे दिल्लीतील हा कार्यक्रम अधिकच संस्मरणीय ठरला.

टीम इनोव्हेशन आयोजित ‘द ड्रीम गर्ल इंडिया टूर’चा पहिला टप्पा नवी दिल्लीतील यशोभूमी कन्व्हेन्शन सेंटर येथे पार पडला. यानंतर जॅस्मिन सँडलस मुंबई, बेंगळुरू आणि चंदीगड येथेही आपल्या लाईव्ह परफॉर्मन्सद्वारे चाहत्यांचे मनोरंजन करणार आहे.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *