शारीरिक संबंधच होणार नाहीत तर मग…, विनायक राऊतांच्या मुलाबाबत मोठा गौप्यस्फोट, गिरीजा यांच्या आईची पहिली प्रतिक्रिया – Marathi News | Girija Raut serious allegations against Vinayak Raut and his family, Girijas mothers first reaction what exactly did she say


गिरीजा राऊत यांच्या आईची प्रतिक्रिया Image Credit source: टीव्ही 9 मराठी

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, विनायक राऊत आणि त्यांच्या कुटुंबाच्या अडचणी वाढल्या आहेत. विनायक राऊत यांच्या सून गिरीजा राऊत यांनी राऊत कुटुंबावर गंभीर आरोप केले आहेत. मात्र दुसरीकडे मात्र विनायक राऊत यांनी गिरीजा राऊत यांचे आरोप फेटाळून लावले आहेत.  ‘माझ्या कुटुंबावर होत असलेले आरोप खोटे आहेत. तीन वर्षांपासून गीतेशची पत्नी त्याच्यासोबत राहत नाही.  गिरीजा राऊत यांनी घटस्फोटासाठी गेल्या महिन्यात याचिका दाखल केली आहे. आता तडजोड करावी, यासाठी दोन्ही वकिलांची बैठक झाली आहे. थ्री बीएचके फ्लॅट, टेरेस फ्लॅट, पाच कोटी मागितले. इलेक्ट्रिक कार मागितली. त्यानंतर पुन्हा घटस्फोटाची नोटीस धाडली. यात कौटुंबिक हिंसाचाराचा उल्लेख आहे. दर महिन्याला 5 लाख रुपये, कायमस्वरुपी दहा कोटी रुपये देण्याची मागणी गिरीजा यांनी  केली आहे, असा दावा राऊत यांनी आपल्या कुटुंबावरील आरोपांना प्रत्युत्तर देताना केला आहे.

दरम्यान त्यानंतर आता राऊतांच्या या दाव्यावर गिरीजा राऊत यांच्या आईची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.  आज विनायक राऊत आरोप करत आहेत,  टेरेस फ्लॅट मागितला ५ लाख मागितले. ⁠मूळात आम्ही मिटिंगसाठी वेळ मागत होतो. ⁠राऊत यांच्या घरी देखील मुलगी आहे, त्यामुळे त्यांनी आरोप करताना विचार करावा.  ⁠मुलगी माहेरी आल्यापासून आम्ही मिटिंगसाठी वेळ मागत आहोत.  आपला मुलगा काय करतो हे त्यांना माहीत आहे.  राऊत यांचा मुलगा घाणेरड्या शिव्या देतो, ⁠मानसिक त्रास देतो आम्ही ३ वर्ष गाठीभेटीसाठी वेळ मागत होतो
त्यांनी केलेले आरोप आम्ही फेटाळत आहोत, ⁠आमच्या मुलीचा गैरफायदा घेतला गेला असा आरोप गिरीजा राऊत यांच्या आईने केला आहे.

दरम्यान ⁠या सर्व अंधश्रद्धा प्रकरणात विनायक राऊत सहभागी आहेत, पैशांची मागणी चुकीची आहे.  आम्हाला पैसे हवे असते तर आम्ही 3 वर्ष थांबलो नसतो. राजकीय पातळी त्यांची चांगली असल्याने आम्ही काही बोललो नाही.  ⁠आम्हाला फक्त मुलगी सासरी चांगली राहावी हीच इच्छा आहे. आम्ही राऊतांच्या अटकेची देखील मागणी करत आहोत. आम्ही हे प्रकरण सामोपचाराने मिटवलं जावं, यासाठी बोलत होतो.  शारीरिक संबंध होणार नाहीत तर मुलं होणार कशी ? आम्ही म्हणायचो डॉक्टरकडे जाऊन उपचार करू, पण राऊतांनी अंधश्रद्धा केली, असा आरोपही यावेळी  गिरीजा राऊत यांच्या आईने केला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *