EPFO ची AI बॉट सेवा, WhatsApp वरच PF च्या सर्व सेवा… क्लेम स्टेट्‍ससह व्याजाची माहिती मिळणार, पण केव्हा? – Marathi News | EPFO AI Chatbot WhatsApp Service Access all PF services right on WhatsApp get details on everything from claim status to interest information


EPFO ची AI बॉट सेवा, WhatsApp वरच PF च्या सर्व सेवा

EPFO AI Chatbot WhatsApp Service: ईपीएफओच्या कोट्यवधी खातेदारांसाठी आनंदवार्ता धडकली आहे. मुख्य पोर्टलापासून ते UAN पोर्टलपर्यंत ईपीएफओने आधुनिकीकरणाची कास धरली आहे. ईपीएफओ लवकरच सदस्यांना खास भेट देणार आहे. कामगार मंत्रालयाच्या अधिकृत सूत्रानुसार ईपीएफओ एका महिन्यात AI आधारित चॅटबॉट सेवा सुरू करण्यात येऊ शकते. त्याआधार युझर्स त्यांच्या WhatsApp वरच पीएफ बॅलन्स, प्रत्येक महिन्याचे योगदान, व्याजाची रक्कम आणि क्लेम स्टेट्‍ससारखी महत्त्वाची माहिती मिळवू शकतील. सूत्रांच्या माहितीनुसार, EPFO AI चॅटबॉट सुद्धा बँकेच्या चॅटबॉट प्रमाणेच काम करेल.

किती दिवसात सुरू होणार AI बॉट सेवा

PF शी संबंधित प्रत्येक माहिती आता तुम्हाला ईपीएफओच्या व्हॉट्सॲपवरच मिळेल. EPFO ने जे AI बॉट तयार केले आहे. ते युझर्सला बँलेन्ससह क्लेम स्टेट्‍सपर्यंत सर्व काही माहिती एका क्लिकवर देईल. या सुविधेमुळे EPF खातेदाराला वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर लॉगिन करण्याची गरज नसेल. अधिकृत सूत्रांच्या माहितीनुसार, EPFO लवकरच AI बॉटच्या मदतीने WhatsApp वर सर्व सेवा देईल. या सेवा येत्या महिनाभरात सुरू करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही सेवा गेमचेंजर ठरणार आहे. ईपीएफओ एटीएम, युपीआयनंतर महत्त्वाची एआय बॉट सेवा सुरू करणार आहे.

नोंदणीकृत मोबाईल क्रमांकाची गरज

ईपीएफओ डिजिटल प्रणाली अधिक स्मार्ट करण्याच्या तयारीत आहे. अधिकृत सूत्रांच्या माहितीनुसार, AI बॉट सेवा या अपग्रेडेशनचाच एक भाग आहे. त्यासाठी EPF च्या मदतीने नोंदणीकृत मोबाईल क्रमांकाची गरज आहे. त्याच मोबाईल क्रमांकावर व्हॉट्सॲप खाते पण असावे. तर या सर्व सुविधांचा लाभ घेता येईल.

यासोबतच गेल्यावर्षी जाहीर करण्यात आलेली एटीएम आणि युपीआय सेवेचा श्रीगणेशा सुद्धा लवकरच होण्याची शक्यता आहे. सदस्यांना एटीएम कार्ड देण्यात येण्याची शक्यता आहे.  याविषयीची यशस्वी चाचणी सुद्धा झाली आहे. तर युपीआयद्वारे पीएफ काढण्याची सुविधा सुद्धा लवकरच सुरू करण्याची शक्यता आहे. पण दोन्ही सुविधा कधी सुरू होणार याची  अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही.

कोण-कोणत्या सुविधा मिळणार?

EPFO च्या AI बॉटच्या मदतीने PF खात्यातील शिल्लक तपासता येईल

AI बॉट PF खात्यात किती व्याज जमा झाले याची माहिती देईल.

किती आणि कधी व्याजाची रक्कम जाम करण्यात आली याची माहिती मिळेल.

तुमच्या खात्यातील मागील व्यवहाराचा तपशील मिळेल.

पीएफ क्लेम केला असेल तर त्याचे स्टेट्‍स तपासता येईल

युझर्सने तक्रार दाखल केली असेल तर त्याची सध्यस्थिती काय हे पाहता येईल



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *