Shadashtak Yog 2026 : शुक्र-शनिच्या युतीने जुळून येणार षडाष्टक योग; ‘या’ 5 राशींची होणार छप्परफाड कमाई, हातात खेळणार पैसाच पैसा


Shadashtak Yog 2026 : ज्योतिष शास्त्रात, ग्रहांची स्थिती आणि त्यामध्ये निर्माण होणाऱ्या दृष्टीकोनाचं विशेष महत्त्व असतं. द्रिक पंचांगानुसार, आज म्हणजेच 23 जुलै 2026 रोजी धन, वैभव आणि सौंदर्याचा कारक शुक्र ग्रह तसेच, न्ययदेवता शनि ग्रह एकमेकांच्या 150 डिग्री अंशावर येऊन षडाष्टक योग (Shadashtak Yog) निर्माण करणार आहेत. 

खरंतर, षडाष्टक योग हा फार आव्हानात्मक मानला जातो. मात्र, शनी आणि शुक्र ग्रह यांच्यात मित्रत्वाचं नातं आहे. त्यामुळे हा षडाष्टक योग काही राशींसाठी फार शुभकारक आणि फलदायी मानला जाणार आहे. 

वृषभ रास (Taurus Horoscope)

शुक्र ग्रह हा वृषभ राशीचा स्वामी ग्रह आहे. शनिबरोबर असलेल्या मैत्रीपूर्ण संबंधांमुळे अचानक धनलाभ मिळण्याची शक्यता आहे. तसेच, नोकरदार वर्गातील लोकांना नोकरीत पदोन्नती सुद्धा वाढ होऊ शकते. भौतिक सुख-सुविधांचा लाभ घ्याल.

मिथुन रास (Gemini Horoscope)

मिथुन राशीच्या लोकांची अनेक दिवसांपासून रखडलेली कामे वेळेत पूर्ण करता येतील. तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल. तसेच, शनिदेवाची तुम्हाला चांगली साथ मिळेल. उत्पन्नाचे नवे सोर्स खुले होतील. 

तूळ रास (Libra Horoscope)

तूळ राशीचा स्वामी शुक्र ग्रह असल्या कारणाने शनिचा शुभ प्रभाव तुम्हाला मिळणार आहे. समाजात तुम्हाला चांगला मान-सन्मान मिळेल. सहकाऱ्यांची चांगली साथ मिळेल. तसेच, तुमचे प्रोजेक्ट्स वेळेत पूर्ण होण्याची शक्यता आहे. 

मकर रास (Capricorn Horoscope)

मकर रास ही शनिची स्वराशी असल्या कारणाने शुक्र-शनिचा हा संबंध मकर राशीच्या लोकांसाठी लाभदायी ठरणार आहे. या काळात तुम्हाला वडिलोत्पार्जित संपत्तीचा देखील लाभ घेता येईल. घरातील वातावरण प्रसन्न राहील. 

कुंभ रास (Aquarius Horoscope)

कुंभ राशीच्या लोकांवर शनिचा प्रभाव असल्या कारणाने रचनात्मक कार्यात तुम्हाला चांगलं  यश मिळेल. शेअर बाजारात तुम्ही पुन्हा नव्याने चांगला व्यवसाय करु शकता. हा काळ तुमच्यासाठी फार अनुकूल असणार आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

इतर महत्त्वाच्या बातम्या :                                               

Shani Vakri 2026 : शनिच्या वक्री चालीचा 5 राशींवर सर्वात पॉवरफुल्ल परिणाम; 27 जुलैपासून उलटी गिनती सुरु, आर्थिक संकटांना सामोरं जाण्याची येणार वेळ



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *