Air Conditioner : काळा, लाल, निळा नव्हे, AC चा रंग नेहमी पांढराच का असतो ? – Marathi News | *Why Are ACs White? know Key Reasons for Air Conditioner Color Choice


आजकाल बहुतेक घरात, दुकानांत एसी हा असतोच. उन्हाळ्यात उकाड्यापासून बचाव करण्यासाठी तर प्रत्येक जण एसी वापरतो. ऑफीसमध्ये हल्ली सेंट्रलाईज्ड एसी बसवलेला दिसतोच. एसीची गारेगार हवा खायला सर्वांनाच आवडतं, रिलॅक्स वाटतं. पण बहुतांश एसी पांढऱ्या रंगातच का बनवले जातात, असा विचार तुम्ही कधी केला आहे का ? मग तो इनडोअर युनिट असो किंवा आउटडोअर युनिट. पांढरा रंग सोडून इतर रंगात एसी कधीच दिसत नाही, असं का, असा प्रश्न तुम्हाला कधीतरी पडला आहे का ? हे जाणीवपूर्वक केलेलं आहे,त्यामागे खास कारणही आहे. चला जाणून घेऊया. यामागे काही महत्त्वाची कारणे आहेत. चला, ती जाणून घेऊया.

1. उत्पादन खर्च होतो कमी

जर एसी उत्पादक कंपन्या एकाच रंगाचे मॉडेल तयार करत असतील, तर उत्पादन प्रक्रिया सोपी होते आणि खर्चही कमी येतो. मात्र, वेगवेगळ्या रंगांमध्ये एसी तयार करायचे झाल्यास उत्पादन खर्च वाढतो. खर्च वाढल्यास कंपन्यांच्या नफ्यावरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे पांढरा रंग कॉमन ठेवून त्याप्रमाणेच एसी तयार केले जातात.

2. पांढरा रंग उष्णता कमी शोषतो

स्प्लिट एसीचे आउटडोअर युनिट घराबाहेर बसवले जातं आणि ते थेट सूर्यप्रकाशाच्या संपर्कात येतं. आणि तुमच्यापैकी बहुतांश लोकांना हे माहीत असेलच की, पांढऱ्या रंगांमध्ये सूर्यकिरणे परावर्तित (Reflect) करण्याची क्षमता जास्त असते, त्यामुळे हा रंग कमी उष्णता शोषतो. परिणामी एसीची कार्यक्षमता टिकून राहण्यास मदत होते. म्हणून एसीसाठी पांढरा रंग वापरला जातो.

3. घराच्या इंटीरियरशी सहज होतो मॅच

पांढरा हा तटस्थ (Neutral) रंग मानला जातो. त्यामुळे तो कोणत्याही प्रकारच्या भिंतींच्या रंगाशी किंवा घरातील इंटीरियरशी सहज जुळून येतो. म्हणूनच पांढऱ्या रंगाचा एसी घरात अधिक आकर्षक दिसतो. जास्त करून पांढऱ्या रंगाच्या एसीलाच प्राधान्य असतंय.

4. धूळ आणि ओरखडे कमी दिसतात

जर एसी काळ्या, राखाडी किंवा इतर डार्क रंगात बनला असता, तर त्यावरची धूळ, माती आणि ओरखडे अधिक स्पष्ट दिसले असते. आणि त्यामुळे एसी फारच लवकर खराब झालेला दिसला असता किंवा तसा वाटला असता. पण पांढऱ्या रंगाच्या एसीवर मात्र धूळ आणि किरकोळ ओरखडे तुलनेने कमी जाणवतात, त्यामुळे तो जास्त काळ स्वच्छ दिसतो. याच कारणांमुळे एसी जनकरली पांढऱ्या रंगातच बनवला जातो.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *