Last Updated:
हाउसिंग सोसायटीमध्ये राहणाऱ्यांसाठी सरकारने गुडन्यूज दिली आहे. आता मेटेनेंसविषयी नवे नियम लागू केले आहेत. हे नियम कोणते चला पाहूया.
मुंबई : तुम्ही हाउसिंग सोसायटीमध्ये राहत असाल. तर तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. सरकारने मेटेनेंन्सच्या नियमात महत्त्वाचा बदल केलाय. अनेकदा गृहनिर्माण संस्था म्हणजेच हाउसिंग सोसायटीचं मेंटेनन्स न भरणाऱ्या सदस्यांमुळे अनेकवेळा आर्थिक अडचणी निर्माण होतात. अशा वेळी सहकारी गृहनिर्माण संस्थांना दिलासा देणारा महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय.
आता या नवीन नियमांनुसार, मेटेनेन्स हा योग्य वेळी भरला नाही तर संबंधित सदस्यांकडून जास्तीत जास्त 12 टक्के वार्षिक व्याज आकारण्याची परवानगी दिली आहे. यापूर्वी ही मर्यादा 21 टक्क्यांपर्यंत होती. ज्यामुळे आता कधी मेटेनेन्स भरण्यास विलंब झाला तर तुम्हाला जास्त व्याज द्यावं लागणार नाही.
महाराष्ट्र राज्यामधील सर्वत हाउसिंग सोसायट्यांमध्ये मेंटेनेन्स शुल्कांविषयी समान नियम लागू राहणार आहेत. यासाठी शासनाने सुधारित नियमावलीही तयार केलेली आहे. फ्लॅट लहान असो किंना मोठा सर्वांना सारखाच दर लागू होईल. लिफ्ट, सुरक्षारक्षक आणि कार्यालयीन खर्चासारख्या सार्वजनिक सुविधांचे शुल्क सर्व सदस्यांना सारखेच द्यावे लागतील.
अनेक सोसायट्यांमध्ये मॅनेजमेंट कमिटी आपल्या पद्धतीने शुल्क किंवा व्याजदर निश्चित करत होत्या. नवीन नियमांमुळे आता अशा मनमानी निर्णयांना आळा बसेल.
या सुधारित नियमांमध्ये मेंटेनन्स शुल्क, त्यांचे वितरण, थकबाकी, वारसा हक्क आणि पुनर्विकासाशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टींचाही समावेश करण्यात आला आहे.
गृहनिर्माण संस्थांच्या नियमावलीत 2016 नंतर प्रथमच मोठ्या प्रमाणावर सुधारणा करण्यात आल्या आहेत. बदलत्या परिस्थितीनुसार नियम अधिक स्पष्ट आणि सुसंगत करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय.
या नियमांनुसार आता संवेदनशील विषयांवर स्पष्ट आणि सुटसुटीत तरतुदी करण्यात आल्या आहेत. सोसायटीला स्वयंपुनर्विकास करायचा असेल. तर मूल्यांकनकर्त्यांच्या रिपोर्टनुसार, जमिनीच्या मूल्यांच्या 10 पट रकमेपर्यंत कर्जाची परवानगी दिली आहे.
या दुरुस्तीमुळे मोठे फायदे होणार आहेत. हाउसिंग सोसायटीचे सभासदत्व, वारस निश्चिती, सोसायट्यांच्या समित्यांची जबाबदारी, मेंटेनेन्स खर्च, थकबाकीवरील व्याज यासोबतच अनेक वादाचे मुद्दे हे निकाली काढले आहेत. यासह सेवा शुल्क, नळपट्टी, लिफ्टची देखभाल, पार्किंग चार्ज यांमध्ये एकनिश्चिती आणलीये.
Mumbai,Maharashtra
Jul 23, 2026 12:57 PM IST
गृहनिर्माण संस्थांमध्ये राहणाऱ्यांना मोठा दिलासा! सरकारने बदलले मेटेनेंसचे नियम, होणार मोठा फायदा
