Uddhav Thackeray Raj Thackeray: धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी मुंबईत एल्गार! ठाकरे बंधूंकडून मोर्चाची हाक, नीट पेपरफुटी प्रकरण तापणार | महाराष्ट्र बातम्या


Last Updated:

Breaking news
Breaking news

मुंबई : नीट पेपरफुटी प्रकरण आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीसह देशातील अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांची आंदोलने सुरू आहेत. दिल्लीतील आंदोलनावर लाठीचार्ज झाल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला राजकीय पक्षांनी पाठिंब्याचे बळ दिले. त्यानंतर आता मुंबईत शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांनी मोर्चाची हाक दिली आहे. येत्या २६ जुलै रोजी, रविवारी मुंबईत मोर्चा निघणार आहे.

मुंबई महापालिका निवडणूक निकालानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी आज विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी मोर्चाची घोषणा करण्यात आली. छत्रपती शिवाजी उद्यान ते सिद्धिविनायक मंदिरापर्यंत मोर्चा काढण्यात येणार असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले.

सविस्तर बातमी थोड्याच वेळेत…

मराठी बातम्या/महाराष्ट्र/

Uddhav Thackeray Raj Thackeray: धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी मुंबईत एल्गार! ठाकरे बंधूंकडून मोर्चाची हाक, नीट पेपरफुटी प्रकरण तापणार



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *