Mumbai: राजभवनावर ड्युटीवर तैनात CRPF जवानाने स्वत: वर झाडली गोळी, घटनेमुळे परिसरात खळबळ | मुंबई बातम्या (Mumbai News)


Last Updated:

 मृत जवानाचे नाव पोलीस कॉन्स्टेबल कौस्तुभ सांगळे असं आहे. कौस्तुभ सांगळे हे  मुंबईतील लोकभवन येथे ड्युटीवर तैनात होते.

News18
News18

मुंबई : मुंबईमध्ये पावसाने धुमशान घातले आहे. तर दुसरीकडे एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबईतील राज्यपालांचे निवासस्थान असलेल्या राजभवनावर अर्थात लोकभवनामध्ये एका सीआरपीएफ जवानाने स्वत: वर गोळी झाडून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील लोकभवनामध्ये तैनात असलेल्या एका केंद्रीय राखीव दल अर्थात SRPF जवानाने आत्महत्या केल्याची घटना संध्याकाळी घडली आहे.  मृत जवानाचे नाव पोलीस कॉन्स्टेबल कौस्तुभ सांगळे असं आहे. कौस्तुभ सांगळे हे  मुंबईतील लोकभवन येथे ड्युटीवर तैनात होते. हे एसआरपीएफ ग्रुप 16 चे जवान होते. नेहमीप्रमाणे  सांगळे हे लोकभवनात गार्ड ड्युटीवर कार्यरत होते. त्यावेळी त्यांनी स्वत: वर गोळी झाडून आत्महत्या केली.

गोळीबाराचा आवाज झाल्यामुळे इतर कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. कौस्तुभ सांगळे हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते.  घटनेची माहिती तातडीने पोलिसांना देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला कौस्तुभ सांगळे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

कौस्तुभ सांगळे हे कोल्हापूर येथील रहिवासी होते. त्यांनी स्वत: वर गोळी झाडून आत्महत्या का केली, याचे कारण अद्याप समजू शकले नाही. या प्रकरणाचा पुढील तपास मालबार हिल पोलीस करत आहेत.

मराठी बातम्या/मुंबई/

Mumbai: राजभवनावर ड्युटीवर तैनात CRPF जवानाने स्वत: वर झाडली गोळी, घटनेमुळे परिसरात खळबळ



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *