Dombivli: ‘मला मारू नका…’, मारकुटे नगरसेवक रमेश म्हात्रेंच्या मारहाणीचा पीडित महिवाल डॉक्टरचाय मानसिक स्थितीवर गंभीर परिणाम, झोपेतही भयकंप; वैद्यकीय क्षेत्रात तीव्र संताप


Ramesh Mhatre Dombivli Case: डोंबिवलीच्या  (Dombivli) शास्त्रीनगर रुग्णालयात शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक रमेश म्हात्रे (Ramesh Mhatre)  व त्यांच्या सहकाऱ्यांनी महिला डॉक्टर व कर्मचाऱ्यांना केलेल्या अमानुष मारहाण प्रकरणाला आता एक अत्यंत गंभीर आणि क्लेशदायक वळण मिळालंय. रुग्णांचे प्राण वाचवणारे डॉक्टर आज स्वतःच्याच सुरक्षिततेसाठी किती हतबल झालेत, याचं विदारक चित्र समोर येतंय. या मारहाणीच्या मानसिक धक्क्यातून डॉ. वृष्टी बाविस्कर अजूनही सावरलेले नाहीत, तर दुसरीकडे त्यांचे सहकारी डॉ. वैभव साळुंके यांचीही मानसिक स्थिती ढासळली असून त्यांनी थेट आपला तोंडी राजीनामा दिलाय. (Ramesh Mhatre Dombivli Case)

अत्यंत धक्कादायक बाब म्हणजे, या हल्ल्यानंतर डॉ. वृष्टी बाविस्कर यांच्या मनावर एवढी दहशत बसली आहे की, त्या रात्री झोपेतून ‘मला मारू नका, मारू नका’ असं ओरडत दचकून उठत आहेत, अशी माहिती त्यांच्या वडिलांनी दिली आहे. त्या आता पुन्हा रुग्णालयात हजर होणार नसल्याचंही स्पष्ट झालंय. डॉक्टरांवर हात उचलणाऱ्या नराधमांनी एका डॉक्टरच्या मनावर किती खोल जखम केली आहे, हेच यातून स्पष्ट होतंय.

Ramesh Mhatre : पक्षाने धाडली कारणे दाखवा नोटीस, रमेश म्हात्रेंचा भूतकाळ ही चर्चेत

रमेश म्हात्रे यांना पक्षाने कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. डॅाक्टर मारहाण प्रकरणी तुमच्यावर पक्षाने कारवाई का करु नये, अशी विचारणा रमेश म्हात्रे यांना पक्षाने केली आहे. तर दुसरीकडे रमेश म्हात्रेवर हत्येचा प्रयत्न आणि अपहरणासारखे गंभीर गुन्हे दाखल दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. मारहाण करणारे शिंदे गटाचे मारकुटे नगरसेवक रमेश म्हात्रे याचा भूतकाळ सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. ज्या वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टरांवर आणि कर्मचाऱ्यांवर रमेश सुकऱ्या म्हात्रे (Ramesh Mhatre) याने हल्ला केला आहे, त्याच वैद्यकीय क्षेत्राने म्हात्रेला दोनदा जीवदान दिले होते. होय, तुम्ही बरोबर ऐकताय! हत्येचा प्रयत्न आणि अपहरणासारखे गंभीर गुन्हे दाखल असलेले ‘बाहुबली’ राजकारणी रमेश म्हात्रे याच्यावर 2008 मध्ये जीवघेणा गोळीबार झाला होता. त्या वेळी शर्टच्या खिशातील पेनाने गोळी अडवली, पण ती पोटात घुसली. मृत्यूशी झुंज देत असताना डोंबिवलीच्या एका खाजगी रुग्णालयातील डॉ. मिलिंद शिरोडकर यांनी तातडीने शस्त्रक्रिया करून म्हात्रेंचे प्राण वाचवले होते. इतकंच नाही, तर त्याआधी झालेल्या एका हल्ल्यात म्हात्रेची किडनी निकामी झाली असताना, याच डॉक्टरांनी त्यांची एक किडनी काढून त्यांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले होते. डॉक्टर शिरोडकरांना समोर पाहिल्यावर ‘बाहुबली’ म्हात्रे कृतज्ञतेपोटी थेट पाया पडायचे. मात्र, आज त्याच डॉक्टरांच्या सहकाऱ्यांवर हात उचलल्याच्या घटनेने म्हात्रे तुरुंगाच्या उंबरठ्यावर आहेत.

इतर महत्वाच्या बातम्या 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *