शैलेश लोढा, दिलीप जोशी, विकी कौशलImage Credit source: Instagram
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या लोकप्रिय मालिकेत तारक मेहताची भूमिका साकारलेले अभिनेते शैलेश लोढा यांच्या मुलीचा लग्नसोहळा नुकताच पार पडला. या शाही विवाहसोहळ्याला बॉलिवूड, राजकारण आणि इतर क्षेत्रातील नामांकित व्यक्ती उपस्थित होते. अभिनेता विकी कौशलसुद्धा शैलेश यांच्या मुलीच्या लग्नाला पोहोचला होता. मात्र या सर्वांत ‘तारक मेहता..’ या मालिकेतील कलाकार कुठेच दिसले नाहीत. त्यावर नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली आहे. इतकी वर्षे या मालिकेत काम करूनही त्यातील एकही कलाकार शैलेश लोढा यांच्या मुलीच्या लग्नाला का उपस्थित नव्हता, असा सवाल नेटकऱ्यांनी केला आहे.
दिलीप जोशी (जेठालाल), मुनमुन दत्ता (बबिताजी), सोनालिका जोशी (माधवी), अमित भट्ट (चंपकलाल, बापूजी), मंदार चांदवडकर (भिडे) यांसह मालिकेतील इतर जुने-नवे कलाकार किंवा निर्माते असितकुमार मोदीसुद्धा या लग्नसोहळ्याला उपस्थित नव्हते. त्यांच्या अनुपस्थितीमुळे अनेक चाहत्यांना असा प्रश्न पडला आहे की, याचा संबंध शैलेश लोढा आणि निर्माते असित कुमार मोदी यांच्यात झालेल्या वादाशी आहे का? यावर प्रतिक्रिया देताना एका युजरने लिहिलं, ‘लोकांच्या लक्षात आलंय की तारक मेहतामधील जवळपास एकही कलाकार या लग्नाला उपस्थित नव्हता. शैलेश यांच्या जवळचे मानले जाणारे दिलीप जोशीसुद्धा दिसले नाहीत. जर वाद फक्त असित मोदींसोबत होता, तर इतर कलाकार लग्नाला का आले नाहीत?’
सोशल मीडियावरील पोस्ट-
Shailesh Lodha, जिन्हें लोग TMKOC के Taarak Mehta के नाम से जानते हैं, ने 2008 से 2022 तक शो में काम किया। बाद में Asit Modi के साथ विवाद के बाद उन्होंने शो छोड़ दिया।
6 जुलाई को उनकी बेटी Swara Lodha की शादी हुई।
लेकिन लोगों ने नोटिस किया कि शादी में TMKOC के लगभग कोई भी… pic.twitter.com/g57ldCBlVL
— Shakuni Mama (@MamaShakuni__) July 8, 2026
शैलेश लोढा यांची कन्या स्वरा लोढा हिचा 7 जुलै 2026 रोजी जोधपूर इथल्या प्रसिद्ध उमेद भवन पॅलेसमध्ये अत्यंत थाटामाटात लग्नसोहळा पार पडला. या सोहळ्याला बॉलिवूड, राजकारण, साहित्य, क्रीडा आणि अध्यात्म क्षेत्रातील अनेक नामांकित व्यक्तींनी हजेरी लावली होती. यात विकी कौशल, कवी कुमार विश्वास, योगगुरू बाबा रामदेव, क्रिकेटपटू इरफान पठाण, राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, खासदार सतीश पुनिया, सिक्कीमचे राज्यपाल ओम प्रकाश माथूर आणि आमदार रवींद्र सिंह भाटी यांचा समावेश होता. निर्माते असित कुमार मोदी यांच्यासोबतच्या वादानंतर शैलेश लोढाने ‘तारक मेहता..’ ही मालिका सोडली होती.