पडिकल वैभवबद्दल काय म्हणाला?
वैभव सूर्यवंशी जे करतो ते खरोखरच अद्वितीय आहे. त्याच्या वयात, त्याच्या फलंदाजीतील ताकद आणि आक्रमकता खरोखरच उल्लेखनीय आहे. खरं सांगायचं तर, कोणीही त्याला कॉपी करण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न करत असेल मूर्खपणाचे ठरेल. तो एक रेअर टॅलेंट आहे आणि तो जे करतो ते अविश्वसनीय आहे. माझ्याबद्दल बोलायचं तर, मी माझ्या सामर्थ्यावर लक्ष केंद्रित करतो आणि माझे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करतो. मी स्वतःची इतरांशी तुलना करत नाही, कारण या स्पर्धेत अनेक प्रतिभावान खेळाडू आहेत. मी याकडे माझे ध्येय साध्य करण्याचा एक मार्ग म्हणून पाहतो.
देवदत पडिकलला वैभवची नाचक्की करायची नाहीये किंवा वैभवबद्दल त्याला नकारात्मकता पसरवायची नाहीये. पण इतर खेळाडूनी केवळ वैभवचा खेळ पाहून खेळू नये असे त्याचे म्हणणे आहे. प्रत्येकाकडे विशेष टॅलेंट असते त्यामुळे केवळ वैभवसारखे खेळू नये तर आपली प्रतिभा ओळखून आपला खेळ तसा खेळावा असे म्हणणे देवदत्त पडिकलचे आहे.
RCB vs SRH: बाई हा काय प्रकार, कृणालची बॉलिंग अॅक्शन काव्या मारनला खटकली; भर स्टेडियममध्ये गंभीर आरोप केले“टी20 क्रिकेट आता अशा प्रकारे विकसित होत आहे. जर तुमच्या संघाला 20 किंवा 30 अतिरिक्त धावा लवकर करण्यास मदत होत असेल, तर तुम्हाला तुमची विकेट गमावण्याची तयारी ठेवावी लागेल. त्यामुळे, लय कायम ठेवणे महत्त्वाचे आहे. आयपीएलमध्ये जवळपास सर्वत्र हाच दृष्टिकोन अवलंबला जातो. आणि जेव्हा तुमच्या फलंदाजीच्या क्रमात खोली असते आणि नंतर आक्रमक फलंदाज असतात, तेव्हा हा दृष्टिकोन स्वीकारणे आणखी सोपे होते,” असे तो पुढे म्हणाला.
वैभव सूर्यवंशी आपल्या बॅटने आयपीएलमध्ये धुमाकुळ घालत आहे. वैभवने 13 सामन्यांमध्ये 44.53 च्या सरासरीने आणि 236 पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने 579 धावा केल्या आहेत. सूर्यवंशीने एक शतक आणि तीन अर्धशतके झळकावली आहेत. वैभवने या हंगामात 53 षटकार आणि 50 चौकार मारले आहेत. सूर्यवंशी ऑरेंज कॅपच्या शर्यतीत कायम आहे. तो शुभमन गिल आणि साई सुदर्शनच्या पुढे आहे, ज्या दोघांनीही 600 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. वैभव सूर्यवंशीचे सध्याचे मुख्य ध्येय राजस्थान रॉयल्सला प्लेऑफमध्ये पोहोचण्यास मदत करणे हे आहे, ज्यासाठी संघाला आपला शेवटचा साखळी सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावाच लागेल.
RCB vs SRH: कोहलीला ट्रॅपमध्ये अडकवण्यासाठी 21 वर्षीय साकिब हुसैनने काय केलं? मॅचनंतर फुलप्रुफ प्लान बोलून दाखवला
राजस्थान रॉयल्ससाठी पुढचा सामना ‘करा किंवा मरा’ असा आहे. ते 24 मे रोजी मुंबई इंडियन्सचा सामना करतील. हा सामना वानखेडे स्टेडियमवर खेळला जाईल. या दोन संघांमधील यापूर्वीचा सामना 7 एप्रिल रोजी झाला होता, ज्यात राजस्थान रॉयल्सने 27 धावांनी विजय मिळवला होता. सामना प्रत्येकी 11 षटकांचा होता आणि प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने 150 धावा केल्या. प्रत्युत्तरात, मुंबईला केवळ 123 धावाच करता आल्या. वैभव सूर्यवंशीने 14 चेंडूंमध्ये 39 धावा केल्या, तर यशस्वी जैस्वालने नाबाद 77 धावा करून सर्वाधिक धावा केल्या.
प्लेऑफचे गणित काय?
24 मेचा सामना खूप महत्त्वाचा असणार आहे. रविवारी प्लेऑफच्या चौथ्या स्थानी कोणता संघ आपली जागा पक्की करतो हे समजेल. प्लेऑफसाठी आता केकेआर, पंजाब आणि राजस्थानचा संघ शर्यतीत आहे. पण जर राजस्थानच्या संघाने मुंबईविरुद्धचा सामना जिंकला तर आपोआप उर्वरित संघ या शर्यतीत बाहेर पडतील.
