Elvish Yadav on CJP protest Shares Post: दिल्लीतील जंतर मंतर येथे ‘कॉकरोच जनता पार्टी’ (Cockroach Janta Party)तील समर्थक आणि आंदोलनकर्त्यांनी संसद भवनाबाहेर घेराव घातला होता. आंदोलन होत असताना पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आली होती (CJP protest). लाठीचार्जमुळे तरुण वर्गाला नाहक वेदना सहन कराव्या लागल्या (LaathiCharge). तर, काही तरुण रक्तबंबाळ होऊन खाली कोसळले. या घटनेचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे (Elvish Yadav). सामान्य जनतेसह काही सिनेकलाकारांनीही पोलिसांकडून करण्यात आलेल्या लाठीचार्जचा विरोध केला. काहींनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन आपला संताप व्यक्त केला. तसेच एल्विश यादव याने देखील या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘विद्यार्थी (Entertainment) तुमच्याजवळ समस्या घेऊन आले होते. त्यांना मारण्याऐवजी त्यांचे म्हणणे ऐकून घ्यायला हवे होते’, असं म्हणत एल्विशने या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
तरुणांवर झालेल्या लाठीचार्जवर एल्विश यादवची प्रतिक्रिया चर्चेत (Elvish Yadav CJP Protest)
सोमवारी, 20 मार्च रोजी ‘कॉकरोज जनता पार्टी’चा संसद मोर्चा पार पडला. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी बरेच लोक 16 जुलैपासून जंतर मंतर येथे दाखल झाले होते. अनेक जणांनी संपूर्ण रात्र फुटपाथवर घालवली. सकाळी जेव्हा आंदोलन सुरु झालं, तेव्हा पोलीस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये संघर्ष सुरू झाला. आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज करण्यात आला. ‘इंकलाब जिंदाबाद’च्या घोषणा देण्यास सुरुवात झाली. यावेळी पोलिसांनी लाठीचार्ज करण्यास सुरुवात केली. पोलिसांकडून करण्यात आलेल्या लाठीचार्जमध्ये अनेक आंदोलनकर्ते जखमी झाले.
First Prove that there was even ONE NEET student there
— Sundheep (@Sundheep0) July 20, 2026
काही रक्तबंबाळ होऊन खाली कोसळले. काहींना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं. दिवसभरातील घडामोडींचे अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियात प्रचंड प्रमाणात व्हायरल झाले. व्हिडीओ पाहताच अनेकांनी संताप व्यक्त केला. काही सिने कलाकारांनी आंदोलनस्थळ गाठले. तसेच समर्थन दर्शवलं. प्रकाश राज, शबाना आझमी, पुनम पांडे या कलाकारांनी जंतर मंतर येथे जाऊन तरुणांना प्रोत्साहन दिलं. तसेच लाठीचार्जनंतर काही सिनेकलाकारांनी पोलिसांविरोधात संताप व्यक्त केला.
एल्विश यादवनेही तरुणांवर पोलिसांकडून करण्यात आलेल्या लाठीचार्जविरोधात संतप्त प्रतिक्रिया दिली. त्याने अधिकृत एक्स अकाऊंटवर प्रतिक्रिया दिली आहे. ‘ना मी बीजेपीचा समर्थक ना काँग्रेसचा समर्थ आहे. पण विद्यार्थ्यांसोबत जे घडतंय ते पू्र्णपणे चुकीचं आहे. आपल्या समस्या पुढे घेऊन आलेल्या विद्यार्थ्यांवर हिंसाचार होणं चुकीचं आहे. त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे, हे जाणून घ्यायला हवं होतं. तसेच योग्य कारवाई करणं गरजेचं आहे’, असं एल्विश यादव म्हणाला. सध्या एल्विश यादवची पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे. त्याच्या पोस्टवर संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहे. ‘सगळ्यात आधी तिथे NEETचा एक तरी विद्यार्थी उपस्थित होता का? हे सिद्ध करा’, असं एकाने कमेंट सेक्शनमध्ये म्हटलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या: