Deool Band 2 BO Collection: 10 कोटींच्या बजेटवर तब्बल 602% नफा; ‘देऊळ बंद 2’ नं आतापर्यंत किती कमावले? ठरला सर्वात मोठा हिट


Deool Band 2 Box Office Collection: सध्या बॉक्स ऑफिसवर ( Box Office) मराठी चित्रपटांचा जबरदस्त दबदबा पाहायला मिळत आहे. अशात प्रवीण तरडे (Pravin Tarde) दिग्दर्शित ‘देऊळ बंद 2’ (Deool Band 2) या चित्रपटाने एकामागून एक नवे विक्रम करताना दिसत आहे. काहीतरी या वर्षाच्या सुरुवातीपासूनच मराठी चित्रपट दमदार ओपनिंगसह चांगलं बॉक्स ऑफिस कलेक्शन करताना दिसत आहेत. वर्षाच्या सुरुवातीला’क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम ‘ या चित्रपटाने दमदार सुरुवात केली. नंतर, ‘राजा शिवाजी’च्या प्रदर्शनामुळे मराठी सिनेसृष्टीला मोठी चालना मिळाली आहे. आता ‘देऊळ बंद 2’ने कमाईचे नवे रेकॉर्ड रचले आहेत. हा चित्रपट आता मराठीतील सर्वाधिक कमाई करणारा चौथा चित्रपट ठरला आहे.

70 कोटींचा टप्पा पार

‘देऊळ बंद 2’ला प्रदर्शित होऊन आता 30 दिवस पूर्ण झाले आहेत. अजूनही हा चित्रपट चांगली कमाई करत आहे. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, या चित्रपटाने 30व्या दिवशी 29 लाखांचा टप्पा गाठलाय. नंतर शुक्रवारी आणि शनिवारी 1.10 कोटी व 98 लाख रुपये कमावले.  सध्या बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाची स्पर्धा तुंबाडची मंजुळा या चित्रपटाशी सुरू आहे. आतापर्यंत चित्रपटाने भारतात 70.22 कोटींचे नेट कलेक्शन केले असून एकूण ग्रॉस कलेक्शन 82.85 कोटींवर पोहोचले आहे.

सर्वाधिक कमाई करणारा मराठीतील चौथ्या चित्रपट

या कमाईसह ‘देऊळ बंद 2’ने मराठी सिनेसृष्टीत मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. भारतात 70 कोटींचा टप्पा पार करणारा हा चौथा मराठी चित्रपट ठरला आहे. या यादीत पहिल्या क्रमांकावर राजा शिवाजी (103.96 कोटी), दुसऱ्या क्रमांकावर सैराट (90 कोटी), तिसऱ्या क्रमांकावर बाईपण भारी देवा (76.28 कोटी) आणि चौथ्या क्रमांकावर ‘देऊळ बंद 2’ (70.22 कोटी) आहे.

शुक्रवारऐवजी गुरुवारी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची ओपनिंग काहीशी कमी होती. 2.89 कोटी रुपयांची कमाई या चित्रपटाने पहिल्या दिवशी केली. आठवड्याभरातच या चित्रपटाने 30.20 कोटी रुपयांचा आकडा गाठलेला. तर दुसऱ्या आठवड्यात 22.40 कोटी रुपयांची कमाई या चित्रपटाने केली. पुणे, मुंबई, नाशिक,नागपूर शहरांमध्ये या चित्रपटाला सर्वाधिक प्रतिसाद मिळाला. तिसऱ्या आठवड्यातही 11.15 कोटींचा टप्पा गाठत चौथ्या आठवड्यात 6.22 कोटींवर हा चित्रपट आला. प्रदर्शनाच्या पाचव्या रविवारी 0.98 कोटी रुपये या चित्रपटाने कमावले.  वीकेंडसह, इकडेच नाही हा चित्रपट पाहिला जातोय.

10 कोटींच्या बजेटवर 602% नफा

‘देऊळ बंद 2’चा बजेट केवळ 10 कोटी रुपये होतं. मात्र 70.22 कोटींच्या कमाईमुळे चित्रपटाने तब्बल 602% नफा कमावला आहे. त्यामुळे हा 2026 मधील सर्वाधिक नफा कमावणारा मराठी चित्रपट ठरला आहे.‘देऊळ बंद 2’ हा 2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या देऊळ बंद  या चित्रपटाचा सिक्वेल आहे. पहिला भागही त्या काळात मोठा हिट ठरला होता. आता त्याचा सिक्वेलही तितकाच यशस्वी ठरत असून प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *