Dhanush Popular Song: अवघ्या 6 मिनिटांत लिहिलेल्या ‘या’ गाण्यानं इतिहास घडवलेला; अख्ख्या जगाला लावलेलं वेड; धनुषचं गाणं तुम्ही ऐकलंत?


Why This Kolaveri Di Song: कधीकधी सहज सहज म्हणून केलेली एखादी गोष्ट एवढी गाजते की, त्याची एकच हवा होते. असंच काहीसं झालं, 2011 मध्ये प्रदर्शित झालेल्या एका गाण्याचं. साउथ इंडस्ट्रीमध्ये 2011 साली एक असं गाणं रिलीज झालं ज्याने जगभरातील प्रत्येकाच्या मनावर राज्य केलं. स्टुडिओमध्ये अवघ्या 20 मिनिटात तयार झालेल्या या गाण्याने भारतातच नाही, तर जगभरात धुमाकूळ घातला. तमिळ आणि इंग्रजीचा भन्नाट मिक्समुळे या गाण्याची क्रेझ अमेरिकेतल्या रेडिओ स्टेशनपर्यंत पोहोचली होती. आजही युट्युबवर हे गाणं अनेकांच्या ऑल टाइम फेवरेट लिस्टमध्ये कायम आहे. पण तुम्हाला माहितीय, या कल्ट गाण्याचे शब्द अभिनेता धनुषने केवळ 6 मिनिटात लिहिले होते. आणि अवघ्या 20 मिनिटांत कंपोज केलेलं हे गाणं आहे. 15 वर्षे उलटून गेली तरी, आजही अनेकांना जशास तसे गाणं पाठ आहे. 

6 मिनिटात बोल लिहिले, 20 मिनिटात कंपोज

2012 मध्ये प्रदर्शित झालेला तमिळ सायकॉलॉजिकल थ्रिलर ‘ 3 ‘ चित्रपटाचं आजही प्रेक्षकांच्या मनात खास स्थान आहे.या चित्रपटाचे दिग्दर्शन ऐश्वर्या रजनीकांत यांनी केलेलं. विशेष म्हणजे ‘व्हाय दिस कोलावरी डी’ हे प्रचंड गाजलेलं गाणं  या फिल्ममधलं आहे. पण फिल्म प्रदर्शित होण्यापूर्वीच 16 नोव्हेंबर 2011 रोजी हे गाणं रिलीज करण्यात आलं होतं. अभिनेता धनुष आणि श्रुती हसन प्रमुख भूमिकेत असलेल्या या चित्रपटातील या गाण्याविषयी आज आपण बोलत आहोत.

या कल्ट सॉंगचे बोल स्वतः अभिनेता धनुषने लिहिले होते. आणि ते आपल्याच वेगळ्या आवाजात गायलं होतं.या गाण्याचा संगीत अनिरुद्ध रविचंदर यांनी केलेलं. संगीतकार म्हणून अनिरुद्ध यांचा तमिळ सिनेमातील हे पहिलंच काम होतं. त्यांनी हे गाणं केवळ 20 मिनिटात कंपोज केलंय. तर धनुषने अवघ्या सहा मिनिटात त्याचे बोल लिहिले आहेत. या गाण्याची सर्वात मोठी खासियत म्हणजे त्याची ‘टँग्लीश’ स्टाईल. तमिळ आणि इंग्रजी शब्दाचा भन्नाट मिश्रण करत हे गाणं तयार करण्यात आलं. तमिळ लोक जे दैनंदिन बोलण्यातले इंग्रजी शब्द वापरतात तेच गुंफून हे गाणं एकत्र तयार झालं. आणि केवळ तमिळच नाही तर सर्व वयोगटातील श्रोत्यांना ते भावलं.

सोशल मीडियावर ‘कोलावरी डी’चा धुमाकूळ

गाणं रिलीज होताच सोशल मीडियावर मोठी खळबळ उडालेली. ट्विटरवर कोलावरी हा हॅशटॅग भारतात नंबर वन ट्रेंडवर होता. रिलीज च्या पहिल्याच आठवड्यात youtube वर या गाण्याने 35 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळवले होते.आज या गाण्याला youtube वर 60 कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.या गाण्याची लोकप्रियता केवळ भारतापुरती मर्यादित राहिलेली नाही.तर अमेरिकेतील रेडिओ स्टेशनवर ही गाणं वाजवला जाऊ लागलं.इतकच नाही तर रिलीज च्या पहिल्या 18 दिवसात तब्बल 41 लाख मोबाईल वरून हे गाणं डाऊनलोड झालं. तमिळ इंग्रजीच्या या मिश्रणामुळे कोलावरी डी आजही भारतातील सर्वाधिक लोकप्रिय गाण्यांपैकी एक आहे.

 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *