Crime news Gadchiroli: इन्स्टाग्रामवर मैत्री, समलैंगिक प्रेमसंबंध फुलले, लग्नाला नकार मिळताच सपासप वार करुन संपवलं


Gadchiroli Murder news: गडचिरोली जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इंस्टाग्रामवरून झालेली मैत्री, मैत्रीतून प्रेमसंबंध आणि प्रेमातून (Love) थेट रक्तरंजित शेवट झाला आहे. एटापल्ली तालुक्यात हा प्रकार घडला असून समलैंगिक संबंधातून (homosexual relationship) लग्नास नकार दिल्याच्या रागातून मित्रानेच मित्राची चाकूने सपासप वार करत गळा चिरून हत्या (Murder news) केली. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. (Gadchiroli News)

सतीशकुमार निसाद असे मृतक युवकाचे नाव आहे. तो नागेपल्ली येथील रहिवासी असून गॅरेज व्यवसाय करत होता. तर आरोपी सूरज हलदार हा ओडिशातील नबरंगपूर जिल्ह्यातील रहिवासी आहे. दोघांची ओळख इंस्टाग्रामवर झाली होती. या ओळखीचं पुढे प्रेमसंबंधात रूपांतर झाले. मात्र सतीशकुमार विवाहित असल्याचं समजल्यानंतर दोघांमध्ये वाद वाढला. सूरज हा सतिशला भेटण्यासाठी दोन दिवसांपूर्वी नागेपल्ली येथे आला होता. रविवारी पहाटे सतीशकुमार आरोपीला ओडिशाला सोडण्यासाठी चारचाकीने निघाला होता. देवदा गावाजवळ दोघांमध्ये जोरदार वाद झाला आणि संतापलेल्या सूरजने चाकूने हल्ला करत सतीशकुमारची हत्या केली. घटनेनंतर आरोपी सूरज पळून जाण्याच्या तयारीत असताना त्याला स्थानिक नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. या घटनेमुळे एटापल्ली तालुक्यात एकच खळबळ उडाली असून हालेवारा पोलिस पुढील तपास करत आहेत.

Nashik Crime: नाशिकमध्ये चितेजवळ अघोरी पूजा

सटाणा शहरातील जुन्या अमरधाममध्ये मध्यरात्री कथित अघोरी पूजा करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.अज्ञात व्यक्तींनी एका अर्धनग्न मांत्रिकासह स्मशानभूमीत येऊन तांत्रिक विधी केल्याचा आरोप होत असून, या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मध्यरात्री काही संशयित व्यक्ती आलिशान वाहनांमधून जुन्या अमरधाम परिसरात दाखल झाल्या. त्यांच्यासोबत भगवे वस्त्र धारण केलेला अर्धनग्न मांत्रिकही असल्याचे सांगितले जात आहे. 

या व्यक्तींनी स्मशानभूमीतील चिता स्थळाजवळ जाऊन कथित अघोरी पूजा सुरू केली. या पूजेसाठी अंडी, लिंबू, उडीद, कवड्या, फुले, कापूर, नारळ तसेच इतर तांत्रिक साहित्याचा वापर करण्यात आल्याचे घटनास्थळी आढळून आले..पूजा संपल्यानंतर हे साहित्य तेथेच टाकून देण्यात आले. विशेष म्हणजे, घटनास्थळावरून काही संशयास्पद वस्तू सोबत नेण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. तसेच पोलिसांनी अमरधाम परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून संशयितांचा शोध घ्यावा, तसेच जादूटोणा प्रतिबंधक कायदा’ अंतर्गत गुन्हे दाखल करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

आणखी वाचा

Solapur : दळणाच्या जात्याचा दगड डोक्यात घातला, मोठ्या भावाला झोपेत असताना संपवलं; दारुच्या नादात सगळंच संपलं, सोलापुरातील घटना

आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *