Chaityabhumi Protest : चैत्यभूमीवरील आंदोलनाला परवानगी नाकारली; आंदोलनकर्त्यांवर FIR दाखल करण्याची प्रक्रिया सुरू


Chaityabhumi Protest Mumbai : मुंबईतील ऐतिहासिक चैत्यभूमी परिसरात कोणत्याही प्रकारच्या आंदोलनाला प्रशासनाकडून परवानगी देण्यात आलेली नव्हती. तरीही सोमवारी शेतकरी कामगार पक्ष (शेकाप), मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (CPI-M) आणि CJP समर्थकांनी या ठिकाणी आंदोलनाचा प्रयत्न केला. मात्र, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून शिवाजी पार्क पोलिसांनी या प्रस्तावित आंदोलनाला स्पष्ट शब्दांत परवानगी नाकारली. परवानगी नाकारलेली असतानाही आंदोलकांनी परिसरात गर्दी केल्याने पोलीस प्रशासन तात्काळ हरकत घेत आक्रमक झाल्याचं दिसून आलं.

Shivaji Park Police FIR Action : 350 आंदोलक ताब्यात, FIR ची प्रक्रिया सुरू

आंदोलनात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांविरोधात आता शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा (FIR) दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या कारवाईबाबत मध्य प्रादेशिक विभाग-3 चे पोलीस उपायुक्त (DCP) यांनी अधिकृत माहिती दिली आहे. चैत्यभूमी हे संवेदनशील ठिकाण असून तेथे कोणत्याही आंदोलनास परवानगी नसल्याने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी ही कठोर कारवाई करण्यात येत असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

Mumbai Protesters Detained Students : ताब्यात घेतलेल्यांमध्ये बहुतांश विद्यार्थ्यांचा समावेश

आंदोलन मोडून काढण्यासाठी पोलिसांनी त्वरित कारवाई करत अंदाजे 300 ते 350 आंदोलकांना ताब्यात घेतले होते. विशेष म्हणजे या ताब्यात घेतलेल्या आंदोलकांमध्ये बहुतांश विद्यार्थ्यांचा समावेश असल्याचे समोर आले आहे. पोलिसांच्या या अचानक झालेल्या धडक कारवाईमुळे चैत्यभूमी आणि दादर परिसरातील वातावरणात काही काळ मोठा तणाव निर्माण झाला होता.

Ban on Assembly in Mumbai : मुंबईमध्ये 15 दिवस जमावबंदी

कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला पाठिंबा देण्याच्या निमित्तानं होणाऱ्या विविध आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी येत्या गुरुवारपासून जमावबंदी लागू करण्यात आली आहे. येत्या 23 जुलैपासून पुढचे 15 दिवस म्हणजे 6 ऑगस्टच्या मध्यरात्रीपर्यंत ही जमावबंदी लागू असेल. पोलीस उपायुक्त अकबर पठाण यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत हा आदेश जारी केला आहे. मुंबईत शांतता आणि सार्वजनिक सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी, जीवित आणि मालमत्तेचं संभाव्य नुकसान टाळण्यासाठी हा प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.

मुंबईप्रमाणंच सीजेपीच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नवी मुंबईतल्या वाशीसह ठाणे, अंबरनाथ आणि भिवंडीत विविध पक्ष आणि संघटनांनी निदर्शनं केली

ही बातमी वाचा:



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *