नीट परीक्षेच्या पेपरफुटीच्या मुद्द्यात दिल्लीतील जंतर मंतरवर मोठे आंदोलन सुरू आहे. कॉकरोच जनता पार्टीकडून हे आंदोलन सुरू असून देशभरातून विद्यार्थी या आंदोलनात सहभागी झाले. काल संसदेच्या दिशेने मोर्चा निघाला. आजही आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. काल अमित शाह यांची भेट धर्मेंद्र प्रधान यांनी घेतली. दिल्लीमध्ये पोलिसांच्या मोठा बंदोबस्त आहे. संसदेत सुरक्षा वाढवण्यात आली. दिल्ली पोलिसांनी जनतेला शांतता राखण्याचे आणि अफवांपासून दूर राहण्याचे आवाहन केले. दरम्यान, पोलिसांनी या हिंसक निदर्शनांबाबत तपास सुरू केला असून, या हिंसाचारामागे एखादे षड्यंत्र असू शकते का, याचाही शोध घेतला जात आहे.
याबाबत थेट पाकिस्तान कलेक्शननेही तपास सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस या प्रकरणातील पाकिस्तानशी संबंधित संभाव्य पैलूचाही तपास करत आहेत. हिंसाचाराबाबत विविध पाकिस्तानी हँडल्सवरून अनेक ट्विट्स केली जात आहेत. त्यामुळेच या आंदोलनामागे पाकिस्तानचा तर हात नाही ना? अशा शंका उपस्थित केली जात आहे.

एका ट्विटमध्ये असा दावा करण्यात आला होता की, या हिंसाचारात सात निदर्शक मरण पावले, 391 जण जखमी झाले आणि 250 जणांना अटक करण्यात आली, अशाप्रकारच्या गोष्टी पाकिस्तानमधील सोशल मीडिया अकाऊंटवरून पसरवल्या जात आहेत. पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, या निदर्शनांचे व्यवस्थापन दिल्ली पोलीस आणि कायदा व सुव्यवस्था राखणाऱ्या इतर नियुक्त केले जात आहेत.
Delhi Police appeals to all protestors to maintain peace, exercise restraint and cooperate with the police in ensuring peace and public order. All participants are requested to conduct themselves in a peaceful manner, refrain from indulging in any unlawful or violent activities… pic.twitter.com/5QBH9dGeha
— Delhi Police (@DelhiPolice) July 20, 2026
या आंदोलनाकरिता कोणत्याही प्रकारचे लष्कर तैनात करण्यात आले नाही. मात्र, विविध दावे केले जात आहेत. पाकिस्तानमधील सोशल मीडिया अकाऊंटवरून भडकवणाऱ्या फेक दावे करत पोस्ट शेअर केल्या जात आहेत. ज्यामुळे तणाव अधिक वाढला. पाकिस्तानकडून मोठे षडयंत्र रचले जात आहे. पाकिस्तानमध्ये मोठी अशांतता आहे. भारतातही तेच घडवण्यासाठी पाकिस्तानकडून हा प्रयत्न केला जात असल्याचे सांगितले जात आहे. आजही जंतर मंतरवर हे आंदोलन सुरू आहे.