Nagpur News: नागपूरमध्ये थरार, संपत्तीच्या वादातून कुटुंबियांकडून तरुणाचा खून, दोन आरोपी अटकेत – Marathi News | Nagpur Crime News Shocking incident in Nagpur young man Abhishek Guddu Dhurve murdered by family members over a property dispute two accused arrested


नागपूरमध्ये थरार, संपत्तीच्या वादातून कुटुंबियांकडून तरुणाचा खून

Nagpur Crime News: नागपूर पुन्हा एका खूनाने हादरले आहे. कळमना येथील पांडुरंगनगर भागात संपत्तीच्या कारणावरून वाद सुरू होता. या कौटुंबिक वादात मध्यस्थी करणे एका तरुणाला भोवले. या तरुणाला नातेवाईकांना जबर मारहाण केली. या मारहाणीत त्याचा मृत्यू ओढावला. अभिषेक गुड्डू धुर्वे असे 30 वर्षीय तरुणाचे नाव आहे. तो शेजारील वैष्णोदेवीनगर परिसरात राहतो. ही घटना कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पांडुरंगनगर भागात घडली. पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून दोन आरोपींना अटक केली आहे. गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून गुन्हेगारांनी पुन्हा डोके वर काढल्याचे दिसून येत आहे.

काय आहे वाद?

प्राप्त माहितीनुसार, अभिषेक धुर्वे यांची आजीसासू तुलसीबाई गायगुवाल (पांडुरंगनगर, कळमना) यांच्या मालमत्तेवरून वाद सुरू आहे. नातेवाईकांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून या मुद्दावर धुसफूस सुरू होती. अभिषेक हा नातेवाईकांना वाद घालू नका असे समजावून सांगत होता. तो गेल्या काही दिवसांपासून मध्यस्थी करत होता. रविवारी अभिषेक हा पत्नी आणि नातेवाईकांसह पांडुरंगनगर येथील तुलसीबाई यांच्या घरी गेला होता. त्यावेळी पुन्हा वाद उफाळला. आजीसासूच्या घराशेजारी राहणारे नातेवाईक दिनानाथ कल्लुराम निर्मलकर( वय 32 वर्ष), संतोष गोवर्धन गायगुवाल (वय 50 वर्ष), लक्ष्मी लालाजी पटेल( वय 55 वर्ष) यांनी संगनमत करत पुन्हा वादा घातला.

अभिषेक त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळी आरोपींनी अभिषेकला मारहाण करायला सुरुवात केली. त्याला बेदम मारहाण केली. त्यात अभिषेक धुर्वे हा गंभीर जखमी झाला. गंभीर जखमी अभिषेकला तातडीने मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मयताचा लहान भाऊ सागर गुड्डू धुर्वे याने आरोपींविरोधात तक्रार दिली. तक्रारीआधारे कळमना पोलीस ठाण्यात सर्व आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी दिनानाथ निर्मलकर आणि संतोष गायगुवाल यांना अटक केली आहे. पोलीस प्रकरणात पुढील तपास करत आहेत. मध्यस्थी करणाऱ्या तरुणाची हत्या झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तर नातेवाईकांनी आक्रोश केला. कुटुंबियांनी आरोपींना कडक शिक्षा करण्याची मागणी केली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *