Last Updated:
Pune Mhada : धावपळीच्या आयुष्यात स्वतःचे हक्काचे घर असावे असे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी एक उत्तम बातमी समोर आली आहे. पुणे महामार्गालगतच्या अत्यंत मोक्याच्या भागात एका मोठ्या योजनेची घोषणा झाली आहे.
पुणे : पुण्यासारख्या वेगाने विकसित होत असलेल्या शहरात हक्काचे घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. पुणे म्हाडा मंडळाने या शहरातील प्रमुख ठिकाणी तब्बल 634 सदनिका विक्रीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. मुंबई-पुणे महामार्गालगत असलेल्या या प्रकल्पात परवडणाऱ्या दरात 1 बीएचके आणि 2 बीएचके घरे उपलब्ध होणार आहेत. हा प्रकल्प नेमका कुठे आहे, घरांची किंमत किती आहे आणि अर्ज कसा करायचा, याची सविस्तर माहिती जाणून घ्या.
यावर्षीच्या म्हाडा लॉटरीचे सर्वात मोठे वैशिष्ट म्हणजे ग्राहकांसाठी उत्पन्नाची अट ही शिथील केली आहे, त्यामुळे आता सर्व उत्पन्न गटातील नागरिक याचा फायदा घेऊ शकतील. महत्त्वाचे म्हणजे अर्जदारांना 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 किंवा 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 यांपैकी एका आर्थिक वर्षाचे उत्पन्न प्रमाणपत्र जोडावे लागणार आहे. त्यासाठी आयटीआर किंवा तहसीलदारांचा दाखला ग्राह्यही धरला जाणार आहे. एवढेच नाही तर नागरिकांसाठी सॅम्पल फ्लॅटही तयार करण्यात आलेले आहेत.
पुण्यातील ताथवडे फेज-2 मध्ये नागरिकांना आता त्यांच्या हक्कांच्या घराचे स्वप्न पूर्ण करता येणार आहे. या प्रकल्पात अल्प उत्पन्न गटासाठी 1 बीएचके शिवाय मध्यम उत्पन्न गटासाठी 2 बीएचके प्लॅट्सही उपलब्ध करुन दिलेले आहेत. ज्या 1 बीएचके घरांची किंमत साधारण 46 लाखांपासून सुरु होते तर 2 बीएचके घरांची किंमत ही 64.5 लाखांपर्यंत आहे. विशेष म्हणजे या प्रकल्पात क्लब हाऊस, फोर व्हिलर पार्किंग, स्विमिंग पूल, ओपनजिम, योगा अशा अनेक आधुनिक सुविधा सुद्धा देण्यात आलेल्या आहेत.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे अर्जदारांकडे या योजनेचा लाभ घेण्यासाठी पासपोर्ट साईज फोटो, ओळख पुरावे जसे पॅन कार्ड, बँकेचा रद्द केलेला चेक किंवा पासबुक, मोबाईल नंबर, ई-मेल आयडी शिवाय 2018 नंतरचे जोमिसाईल असणे आवश्यक ठरणार आहे. म्हाडाने घेतलेल्या या निर्णयाने पुणेकरांना आता हक्काचे घर मिळणे सोपे झाले आहे.
Mumbai,Maharashtra
Jul 21, 2026 11:54 AM IST
MHADA : हायवे टच आणि प्राइम लोकेशन! पुण्यात म्हाडाकडून 46 लाखांपासून घर खरेदीची सुवर्णसंधी; पाहा कुठे अन् किती घरं
