ममता बॅनर्जींना बंडखोरांचा आणखी एक दणका, आता थेट कार्यालयावर कब्जा; बंगालमध्ये काय घडतंय? – Marathi News | West bengal political crisis tmc rebel mlas take control of party office kolkata
पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसची सत्ता गेल्यापासून माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मोठे धक्के बसले आहे. काही दिवसांपूर्वी पक्षात दोन गट पडल्यानंतर आता बंडखोर आमदारांनी कोलकात्यातील पक्षाच्या मुख्यालयावर ताबा मिळवत तृणमूल काँग्रेसवरील आपला दावा अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न केला. विधानसभेतील विरोधी पक्षनेते ऋतब्रत बॅनर्जी आणि त्यांच्या समर्थकांनी पक्ष मुख्यालयात बैठक घेतली. यावेळी त्यांनी कार्यालयाचे कुलूपही बदलले…