CM Thalapathy Vijay On NEET Exam CJP Protest: सध्या देशात नीट पेपरफुटी प्रकरण (NEET Paper Leak Case) आणि त्यावरुन केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत कॉकरोच जनता पार्टीनं (Cockroach Janta Party) आंदोलन सुरू केलंय. आता हे आंदोलन देशातल्या गावाखेड्यांत पोहोचलं असून सर्वत्र याचे पडसाद पाहायला मिळत आहेत. अशातच, बहुतेकांनी या आंदोलनाला पाठींबा दिला आहे. तर, काहींनी आंदोलकांच्या विरोधात प्रतिक्रिया दिल्यात. अशातच सध्या आपल्या सडेतोड कामाच्या शैलीसाठी प्रसिद्ध असलेले तामिळनाडूचे मुख्यमंत्री थलपती विजय (Tamil Nadu Chief Minister Thalapathy Vijay) यांनीही विद्यार्थी आंदोलन आणि नीट परीक्षेतील घोटाळा यावर प्रतिक्रिया दिली आहे.
तमिळनाडूचे मुख्यमंत्री आणि ‘तमिळगा वेत्री कळगम’ (TVK) चे अध्यक्ष सी. जोसेफ विजय यांनी बुधवारी नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणावरुन सुरू असलेल्या देशव्यापी निदर्शनांबाबत आपली भूमिका मांडली. त्यांनी नवी दिल्लीत काँग्रेस नेते राहुल गांधी आणि इतर विरोधी पक्षनेत्यांना करण्यात आलेल्या अटकेचा निषेध केला. थलपती विजय (Thalapathy Vijay) यांनी विद्यार्थी आंदोलकांवरील पोलीस कारवाईचं वर्णन ‘अलोकतांत्रिक’ असं केलंय. ‘संसद मार्च’मध्ये सहभागी झालेल्या आंदोलकांवरील पोलीस कारवाईनंतर, संसद परिसरात आंदोलन करणाऱ्या विरोधी पक्षांच्या पाठीशी आपला पक्ष (TVK) ठामपणे उभा असल्याचं विजय यांनी ट्वीट करुन सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रसिद्ध केलेल्या निवेदनात स्पष्ट केलं आहे. तसेच, नीट परीक्षेला (NEET) ला आपला पक्ष ठामपणे विरोध करत असल्याचंही त्यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केलंय.
थलपती विजय नेमकं काय म्हणाले? (Thalapathy Vijay On Student Protest)
थलपती विजय यांच्या टीव्हीके (TVK) पक्षाने ट्विटरवर पोस्ट शेअर करत लिहिलं की, ‘नीट (NEET) परीक्षा लागू झाल्यापासून, केवळ त्या परीक्षेची विश्वासार्हता कमी झाली नाही, तर विद्यार्थ्यांना मानसिक तणावाचा सामना करावा लागत आहे आणि त्यांच्या भविष्यातील स्वप्नांवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.’
![]()
नीट (NEET) पूर्णपणे रद्द करावी : टीव्हीके (TVK On NEET)
टीव्हीके (TVK) नं म्हटलं आहे की, नीट (NEET) परीक्षेमुळे दरवर्षी विद्यार्थ्यांना होणारं नुकसान कधीही न संपणारं आहे. त्यामुळे, आम्ही केंद्र सरकारकडे नीट (NEET) परीक्षा पूर्णपणे रद्द करण्याची मागणी करतो.
राहुल गांधींच्या अटकेवर काय म्हणाले थलपती विजय? (Thalapathy Vijay On Rahul Gandhi)
पंतप्रधानांच्या निवासस्थानी धरणे आंदोलन करत असताना राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे आणि प्रियांका गांधी यांना ताब्यात घेतल्यानंतर हा प्रकार अत्यंत निंदनीय असल्याचं टीव्हीकेनं म्हटलंय. टीव्हीकेनं पुढे लिहिलंय की, “दिल्लीतील युवा आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पुढे आलेले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना दिल्ली पोलिसांनी फरफटत नेऊन हातकड्या घालणं, हा लोकशाहीच्या हक्कांवर झालेला एक हल्ला आहे. हे अत्यंत निंदनीय आहे…”
सोमवारी नवी दिल्लीत हजारो विद्यार्थी, युवा संघटना आणि राजकीय कार्यकर्त्यांनी ‘संसद मोर्चा’मध्ये सहभाग घेतला. आंदोलकांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची, नीट (NEET) वादामुळे प्रभावित झालेल्या विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्याची आणि परीक्षा पद्धतीत व्यापक सुधारणा करण्याची मागणी केली. या आंदोलनादरम्यान मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तसेच, बॅरिकेड्स उभारण्यात आले होते आणि आंदोलकांनी संसदेच्या दिशेनं कूच करण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यावर लाठीचार्ज करण्यात आला.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Anupam Kher On Student Protest: राम मंदिरनंतर आता CJP आंदोलनावरुन अनुपम खेर यांचा संताप; म्हणाले…